Kawar Yatra Dj Hingoli : श्रावण महिन्यात हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ येथे निघालेल्या कावड यात्रेदरम्यान मोठा दुर्दैवी अपघात झाला. डिग्रस-कऱ्हाळे फाट्याजवळील कावड यात्रेत सहभागी असलेल्या दोन डीजे वाहनांची एकमेकांना धडक लागली. या भीषण धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं कावड यात्रेला गालबोट लागल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : ऑगस्टच्या शेवटी ग्रहांची हालचाल, 'या' राशींचे नशीब फळफळणार
कावड यात्रेदरम्यान एकाचा जागीच दुर्दैवी अंत
प्राथमिक माहितीनुसार, कावड यात्रेदरम्यान काही भाविक डीजेच्या तालावर महादेवाच्या गाण्यावर नाचत होते. याचदरम्यान डिजेवर गाणी वाजवण्यावरून ही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. या अतिउत्साहात दोन डीजे वाहनांची धडक झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृत्यूमागील कारण अद्याप समोर नाही
मृताची नेमकी ओळख आणि मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय. कावड यात्रा आणि मोठ्या आवाजातील डिजेच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.
हे ही वाचा : मुंबई : गणपती आगमनाला गालबोट, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू; काय घडलं?
प्रशासकीय नियम: अशा धार्मिक व सार्वजनिक मिरवणुकीत डिजेच्या उच्च पाळीवर आणि सुरक्षिततेच्या मानकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडक नियम व निर्देश दिले जातात. मिरवणुकीत उच्च आवाजातील डिजे आणि सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत.
ADVERTISEMENT












