Government Jobs : पुण्यातील खडकी येथील हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये 'केमिकल प्रोसेस वर्कर' (CPW) या पदासाठी एकूण 85 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड कंत्राटी/मुदतीवर (Tenure Based) केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये अधिक महागाई भत्ता (DA) असा बेसिक पे मिळणार असून, नोकरीचे ठिकाण खडकी (पुणे) हे असणार आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवारांकडे नॅशनल ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) असणे आवश्यक आहे. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) अंतर्गत AOCP, IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक यांपैकी कोणत्याही ट्रेडमधील पात्रता असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा : आयफोनसाठी 13 वर्षीय नात झाली क्रूर, प्रियकरासोबत मिळून आजोबांना संपवलं
पात्रतेचे इतर निकष
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, 4 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 40 वर्षांपर्यंत असावे. नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली असून, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) वर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत लागू राहील. या भरतीसाठी एकूण 85 जागांपैकी अराखीव (UR) 35, ओबीसी (OBC) 23, अनुसूचित जाती (SC) 13, अनुसूचित जमाती (ST) 06 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 08 जागा राखीव आहेत.
हे ही वाचा : मुंबईची खबर : बीएमसी जेनझीला देणार फेलोशिप, महिना 60 हजारांहून अधिक मानधन, काय आहे योजना?
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता 'द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे, महाराष्ट्र - 411003' असा आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












