SIB Recruitment : साउथ इंडियन बँक लि. (SIB) मध्ये ज्युनिअर ऑफिसर (बिजनेस प्रमोशन ऑफिसर) या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक भारतीय उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 19 ऑगस्ट पासून सुरू झाली असून 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.southindianbank.bank.in) अर्ज सादर करावा लागेल.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 1996 किंवा त्यानंतर झालेला असावा. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय, बँक किंवा एनबीएफसी (NBFC) मध्ये रिटेल ॲसेट्स किंवा लायबिलिटी प्रॉडक्ट्स क्षेत्रात किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा : सहकारी महिलेवर चाकूने चार वार, रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात थरार, शांत डोक्याने कामावर लागला
तीन वर्षांचा करार
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ज्युनिअर ऑफिसर / बिजनेस प्रमोशन ऑफिसर या पदावर कराराच्या तत्त्वावर केली जाईल. सुरुवातीला हा करार 3 वर्षांचा असेल, जो उमेदवाराची कामगिरी आणि बँकेच्या आवश्यकतेनुसार पुढील कालावधीसाठी वाढवला जाऊ शकतो. हे पद पूर्णपणे टार्गेट-बेस्ड सेल्स रोल स्वरूपाचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या भागांमध्ये पोस्टिंग दिली जाईल, तसेच बँकेच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण भारतात कुठेही बदली केली जाऊ शकते.
हे ही वाचा : Whatsapp वर स्टेट्स ठेवून दुहेरी हत्याकांड, नंतर स्वत:वर गोळीबार
7 लाख रुपयांहून अधिकचं पॅकेज
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक एकूण 7.85 लाख रुपये सीटीसी (CTC) पॅकेज मिळेल. यामध्ये 4.49 लाख रुपये निश्चित वेतन, 2.88 लाख रुपये कामगिरीवर आधारित व्हेरिएबल पे आणि 48 हजार रुपये बँक प्रीमियम असलेले 5.25 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच समाविष्ट आहे. सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी 31 ऑगस्ट पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
ADVERTISEMENT












