parbhani kausadi news, दिलीप माने : परभणी जिल्ह्यातील कौसडी येथे तीन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्याने एकच खळबळ उडाली होती. तब्बल तीन तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलंय. शेतात खेळत असताना शेख अदनान शेख नदीम हा तीन वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. चिमुकला बोअरवेलमध्ये अडकल्याने त्याच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
बोअरवेलच्या दोन्ही बाजूला खड्डा खांदून काढलं बाहेर
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने मदत कार्याला सुरुवात केली. बचाव कार्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी डॉक्टरांची टीम, ऑक्सिजन सिलेंडर आणि ॲम्बुलन्स पाठवण्यात आली. चिमुकल्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या दोन्ही बाजूला खड्डा खणण्याचे काम करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा : पुणे: NCP चे आमदार म्हणतात, 'रस्ते आहेत तर अपघात होणारच...' प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारवरच चिडले
बाहेर काढल्यानंतर चिमुकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल
तब्बल तीन तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर चिमुकल्याला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. गावकऱ्यांनीही बचाव कार्यात प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर शेख अदनान सुरक्षितपणे बोअरवेलमधून बाहेर आला. चिमुकला व्यवस्थित बाहेर निघाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर चिमुकल्याला ॲम्बुलन्समधून रुग्णालयाकडे हलवण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने बचाव कार्याला अखेर यश आले. कौसडी शेत शिवारात घडलेल्या या घटनेनंतर सुरू झालेल्या बचाव कार्याची सांगता चिमुकल्याच्या सुखरूप सुटकेने झाली.
ADVERTISEMENT












