महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम; पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट, अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

मुंबई तक

20 Aug 2026 (अपडेटेड: 20 Aug 2026, 08:19 AM)

maharashtra weather update : महाराष्ट्रातील पावसाचा दडी मारली असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुढील 48 तासांत मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

maharashtra weather update

maharashtra weather update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम; पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट

point

अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

maharashtra weather update : महाराष्ट्रात सध्या पावसाचा ब्रेक कायम असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी पावसाचा जोर वाढलेला दिसत नाही. Monsoon Activity कमकुवत झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम असून हे अंतर वाढताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने पोहोचले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील हवामानावर होत असून विदर्भातही काही प्रमाणात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात त्याची तीव्रता फारशी नसणार आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?

मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी महाराष्ट्रावर त्यांचा फार मोठा परिणाम सध्या दिसत नाही. महाराष्ट्राच्या काही भागांवर ढगांची निर्मिती होताना दिसत असून विदर्भ आणि मराठवाड्यातही काही प्रमाणात ढग तयार झाले आहेत. यामुळे मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाच्या स्थितीकडे पाहिल्यास मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परभणीत सरासरीपेक्षा 22 टक्के, नांदेडमध्ये 20 टक्के, लातूरमध्ये 23 टक्के आणि धाराशिवमध्ये 20 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून गडचिरोलीत 23 टक्के, तर अमरावतीत 31 टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा : पुणे: NCP चे आमदार म्हणतात, 'रस्ते आहेत तर अपघात होणारच...' प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारवरच चिडले

कोणत्या भागात सरासरीच्या जवळचा पाऊस पडला? 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र सरासरी पाऊस झालेला असून तो सरासरीपेक्षा थोडासा अधिक आहे. दुसरीकडे पुणे, नाशिक आणि पालघरमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. पुण्यात सरासरीपेक्षा 42 टक्के, पालघरमध्ये 42 टक्के, तर नाशिकमध्ये जवळपास 70 टक्के अधिक पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या भागांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. साताऱ्यात 14 टक्के कमी, सांगलीतही कमी, अहिल्यानगरमध्ये 17 टक्के कमी, जळगावमध्ये 12 टक्के, बुलढाण्यात 6 टक्के आणि वाशिममध्ये 19 टक्के कमी पाऊस झाला आहे. तरीही सरासरीच्या जवळचा पाऊस झाल्याने या भागांना सरासरी पावसाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

पुढील 48 तासांचा अंदाज पाहता 20 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत थंडरस्टॉर्मची चिन्हे असून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे थंडरस्टॉर्मची चिन्हे देण्यात आली आहेत. या भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि एखादी हलकी पावसाची सर येण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही. तसेच 21 ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील पावसाचा ब्रेक कायम राहण्याची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांपुरताच हलक्या पावसाचा अंदाज आहे.