Pandavkada Death : निलेश पाटील - पनवेलच्या खारघर येथील पांडवकडाचा धबधबा पर्यटकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. एकाच आठवड्यात मृत्यूची ही दुसरी घटना घडली आहे. बुधवारी 19 ऑगस्ट रोजी धबधब्यात एक व्यक्ती बुडाल्याची घटना घडली आहे. प्रणव मिश्रा (वय 16) अशी मृत्यू झालेल्या मुलाची ओळख समोर आली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाने सायंकाळी 5.49 वाजता पांडवकडा धबधबा येथे व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : चंद्र ग्रहण अत्यंत संवेदनशील राहणार 'या' राशींची परीक्षा घेणार
खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर प्रणवचा पाण्यात बुडून मृत्यू
नंतर खारघर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. धबधब्यावरून पाणी कोसळताना दिसत होते. परिस्थिती अगदीच गुंतागुंतीची होती. तपासादरम्यान, प्रणव सुमारे 10 ते 12 फूट खोल खडकाच्या फटीत अडकलेला आढळला. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत, प्रणवला पाण्यातून बाहेर काढले होते, मात्र तोवर उशिर झाला होता. पाण्यात बुडून प्रणवचा मृत्यू झाल्याची घटना आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पावसाळ्यात पांडवकडा धबधब्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, पांडवकडा धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : पुणे : घरात एकट्या असलेल्या मुलीवर शेतात नेऊन अत्याचार अन् मर्डर, 'त्या' चुकीने आरोपी सापडला
धबधब्याच्या पाण्याखाली भिजणे, तसेच पावसाळ्यात ट्रेक करणे हे धोकादायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. प्रत्येक पावसाळ्यात पांडवकडा येथे मृत्यू होतो, यामुळे पांडवकडा हे पर्यटनस्थळ मृत्यूचा सापळा बनत चाललाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT












