Astrology : चंद्र ग्रहण अत्यंत संवेदनशील राहणार 'या' राशींची परीक्षा घेणार

Astrology : ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार, चंद्र ग्रहण हे विशेष आणि अत्यंत संवेदनशील असेल. हे ग्रहण प्रामुख्याने चार राशींची परीक्षा घेऊ शकते, त्या राशी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आल्यात.  

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार, चंद्र ग्रहण हे विशेष आणि अत्यंत संवेदनशील असेल. ग्रहणावेळी चंद्र ग्रह हा कुंभ राशीत असणार आहे, त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शनीची रास आहे. शिवाय, हे नक्षत्र राहूचेही असेल, म्हणजेच शतभिषा, शनी आणि राहूचा दुहेरी प्रभाव चंद्र ग्रहाला पूर्णपणे व्यापून टाकेल, ज्याचे परिणाम जगभरात आणि आपल्या जीवनात जाणवू शकतील.
 

Astrology

2/6

हे ग्रहण प्रामुख्याने चार राशींची परीक्षा घेऊ शकते, त्या राशी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आल्यात.  
 

Astrology

3/6

कर्क 

कर्क राशीवर चंद्राचे अधिपत्य आहे, त्यामुळे याच राशीत जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. डोकेदुखी, तसेच डोळ्यांच्या समस्या आणि रक्तदाब ही चिंतेची बाब असण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही नकारात्मक संगतीपासून दूर राहावे.  
 

Astrology

4/6

सिंह 

सिंह राशीत जन्मलेल्या व्यक्तींना वाढत्या अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागण्याची अधिक शक्यता आहे. ज्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपण बोलण्यात संयम ठेवावा, अन्यथा कुटुंबातील प्रस्थापित संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात कामाचा ताण अधिक जाणवेल. 
 

Astrology

5/6

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आणि मुलांच्या आरोग्याबाबत काळजी वाटेल. आर्थिक बाबींमध्ये विचार करूनच निर्णय घ्यावा. 
 

Astrology

6/6

मीन

मीन राशीतील लोकांनी मोठे निर्णय घेणे टाळावेत. याच काळात गुंतवणूक करणे किंवा पैसे उधार देणे हानिकारक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही वाद टाळा.