Mumbai News : मुंबईत आधीच मैदानांची कमतरता असतानाचा बीएमसीने घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा रंगली आहे. बीएमसीच्या सर्वसाधारण सभेने मंगळवारी (18 ऑगस्ट) रात्री वांद्रे येथील नेव्हिल डि'सोझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण क्रीडांगणावरून 'सभागृह आणि प्रदर्शन केंद्र' (कॉन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर) असे बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिवसेना युतीचे बहुमत असल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.
ADVERTISEMENT
फुटबॉलपटूंमध्ये नाराजी
या निर्णयामुळे मुंबईतील फुटबॉलपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शहरात आधीच फुटबॉल खेळण्यासाठी फार कमी मैदाने शिल्लक असताना, नेव्हिल डि'सोझा मैदान गमावल्यामुळे खेळासाठीची जागा आणखी कमी होईल, अशी भीती खेळाडूंनी व्यक्त केली आहे. जर अशीच मैदाने नष्ट होत राहिली तर मुंबई आणि भारतातून भविष्यात नवे फुटबॉल स्टार कसे तयार होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे मैदान ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवणारे पहिले भारतीय खेळाडू नेव्हिल डि'सोझा यांच्या नावाने ओळखले जात असल्याने भारतीय फुटबॉलच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली
'मैदाने मित्रांना वाटण्यास सुरुवात'
फुटबॉलपटूंच्या मते, हे मैदान हिरावून घेतल्यास मुंबई केवळ एक क्रीडांगणच गमावणार नाही, तर आपल्या फुटबॉल संस्कृतीचा एक महत्त्वाचा भागही गमावेल. माजी राज्यमंत्री आणि शिवसेना (युबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर बीएमसी आणि सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत टीका केली आहे. एक्स (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये ठाकरे यांनी आरोप केला आहे की, पालिकेतील भाजपप्रणीत राजवटीने मुंबईतील मोकळ्या जागा आणि खेळाची मैदाने आपापल्या आमदारांना (एमएलसी) आणि आर्थिक मदत करणाऱ्या मित्रांना वाटण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : मुलगा होईल असं दाखवलं आमिष, महिलेनं 47.88 लाख रुपयांना घातला गंडा
जेन झींच्या आंदोलनाचा बदला?
आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला "मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रांकडून झालेली जमिनीची लुटालूट" असे संबोधत ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. यामागील घाईगडबडीवर प्रश्न उपस्थित करत, जेन झी आणि तरुणांनी सरकारच्या अकार्यक्षमतेविरोधात केलेल्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठीच भाजपने हे पाऊल उचलले आहे का, असा सवालही त्यांनी केला. क्रीडाप्रेमी आणि विरोधकांच्या या विरोधामुळे वांद्रे येथील या मैदानाचा मुद्दा आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












