मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

मुंबई तक

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधींनी आंदोलनासाठी मुंबई पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंचा तगडा डाव,

point

समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी आंदोलन, उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे. जरांगे पाटील यांचे अधिकृत प्रतिनिधी गंगाधर काळकुटे यांनी 17 ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.

हेही वाचा : बीड : महिलेचे बाळंतपण झाले, पण डॉक्टर पोटातच विसरले हातमोजे अन् रुमाल; पुढं काय घडलं?

मनोज जरांगेंच्या प्रतिनिधींकडून निवेदन सादर 

मराठा समाजाच्या न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, पूर्णपणे घटनात्मक चौकटीत आंदोलन केले जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाची संथ स्थिती, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट