Maharashtra Weather : राज्यात पावसाची संथ स्थिती, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मान्सूनची स्थिती सध्या संथ आहे. जाणून घ्या 19 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather ( AI Generated Photo)
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही दिवसांपासून मान्सूनची स्थिती संथ

point

19 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मान्सूनची स्थिती सध्या संथ आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस, तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. अशातच जाणून घ्या 19 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : बहाद्दरानं अपहरणाचं केलं नाटक, कुटुंबालाच केली 5 लाखांची मागणी

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाटा अंदाज राहिल. रायगडमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरीत विजाच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र्

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगलीत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.