बहाद्दरानं अपहरणाचं केलं नाटक, कुटुंबालाच केली 5 लाखांची मागणी
crime news : पैसै मिळवण्यासाठी एका बहाद्दराने डोकं लावून स्वत:चे अपहरण झाल्याचे नाटक सांगून 5 लाखांची मागणी केली. तरुणाने रडत आपल्या नातेवाईकांसाठी एक व्हिडिओ बनवला होता. नंतर तोच व्हिडिओ नातेवाईकांकडे पाठवण्यात आला होता. आरोपीची ओळख समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अपहरणाचे नाटक करत तरुणाची कुटुंबीयांकडे 5 लाख रुपयांची मागणी
बंड गार्डन पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्रकरण उघडं
Crime News : पैसै मिळवण्यासाठी एका बहाद्दराने डोकं लावून स्वत:चे अपहरण झाल्याचे नाटक सांगून 5 लाखांची मागणी केली. तरुणाने रडत आपल्या नातेवाईकांसाठी एक व्हिडिओ बनवला होता. नंतर तोच व्हिडिओ नातेवाईकांकडे पाठवण्यात आला होता. आरोपीची ओम प्रकाश गौरीशंकर (वय 19) अशी ओळख समोर आली. ही घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्याच्या बबेरू तालुक्यातील जलालपुर गावातील आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीत 10 धडाकेबाज निर्णय
अपहरणाचे नाटक करत तरुणाची कुटुंबीयांकडे 5 लाख रुपयांची मागणी
ओम प्रकाश गौरीशंकर पुणे येथे नोकरीसाठी आला होता. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो त्रासला होता. नोकरी शोधताना त्याला मोठी समस्या निर्माण झाली, यानंतर त्याने कुटुंबीयांना पैशांची मागणी केली होती. गौरीशंकरने आपल्या नातेवाईकांना आणि मोठ्या भावाला सांगितलं की, त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी एक व्हिडिओ देखील पाठवला होता, ज्या व्हिडिओत त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
कथितरित्या अपहरणाच्या घटनेनं त्याच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांना फोन करत संपर्क केला. तक्रार मिळताच, शाहजहांपुर पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत त्यांना सांगितलं की, उत्तर प्रदेशातून एका व्यक्तीचे पुण्यात कथितरित्या अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्याने 5 लाखांची मागणी देखील केली होती. ज्यात पुणे पोलिसांनी तात्काळपणे तपास सुरू ठेवला.
16 ते 17 ऑगस्टच्या रात्री आणि 17 ऑगस्टच्या सकाळी रात्रीच्या गस्तीवरील अधिकाऱ्यांसह विविध पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी कथित अपहरणकर्ते आणि पीडित व्यक्तीचा शोध घेतला.
