Raksha Bandhan 2026 Date: रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

मुंबई तक

• 09:09 PM • 18 Aug 2026

रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे. याशिवाय राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि चंद्रग्रहणाची वेळही समजून घ्या.

raksha bandhan 2026 date 28 august shubh muhurat rakhi time

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

Raksha Bandhan: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि स्नेहाचा सण आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधनाची तारीख 27 की 28 ऑगस्ट, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हिंदू पंचांगानुसार, श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होईल. तिथीनुसार यंदा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांग पाहून  याच तारखेचे निर्धारण केले आहे.

हे वाचलं का?

28 ऑगस्टला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 6 वाजून 23 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे. याशिवाय, दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून ते 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्तातही भावाच्या मनगटावर राखी बांधता येईल.

हे ही वाचा>> मुंबईची खबर : बेस्ट कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरु, काय आहेत मागण्या?

रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण?

यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहणही होणार आहे. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण सकाळी 8 वाजून 4 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतात रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही अडथळा राहणार नाही आणि शुभ मुहूर्तावर राखी बांधता येईल.

हे ही वाचा>> Govt Jobs : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 2,482 पदांची भरती

रक्षाबंधनाशी संबंधित धार्मिक कथा

रक्षाबंधनाबाबत धार्मिक ग्रंथ आणि लोकपरंपरांमध्ये विविध कथा सांगितल्या जातात. एका मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला दुखापत होऊन रक्त आले होते. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. द्रौपदीच्या या स्नेहाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि पुढे चीरहरणाच्या वेळी तिची लाज वाचवली, अशी कथा सांगितली जाते.

दुसऱ्या कथेनुसार, माता लक्ष्मीने राजा बलीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले आणि भगवान विष्णूंना परत आणले. तसेच मेवाडच्या राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवून मदतीची विनंती केल्याची ऐतिहासिक लोककथाही प्रसिद्ध आहे.