मुंबईची खबर : बेस्ट कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरु, काय आहेत मागण्या?

मुंबई तक

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाच्या मागण्यांसंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियनने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

BEST Employee Hunger Strike
BEST Employee Hunger Strike
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बेस्ट कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरु

point

काय आहेत मागण्या?

BEST Employee Hunger Strike : मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट वर्कर्स युनियन'ने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून (18 ऑगस्ट) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बेस्टचे नियमित कर्मचारी, खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या वेट लीजवरील गाड्यांचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या?

युनियनच्या मुख्य मागण्यांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून रखडलेले वेतन करार तातडीने पूर्ण करणे समाविष्ट आहे. युनियनने 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन करार त्वरित लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करून मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान वेतनश्रेणी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही प्रशासनासमोर ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 44 वर्षीय हसीनाचे 23 वर्षीय तरुणासोबत अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या 40 वर्षीय पार्टनरची हत्या

सरकारने निधी मंजूर करावा

बेस्ट वर्कर्स युनियनने वेट लीज तत्त्वावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरही भर दिला आहे. खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना 'समान काम, समान वेतन' या तत्त्वाच्या आधारे योग्य वेतन आणि सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युटी आणि इतर थकीत दावे वेळेत मंजूर करावेत तसेच बेस्ट उपक्रमाची बिकट आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असणारा निधी सरकारने त्वरित मंजूर करावा, असा आग्रह धरण्यात आला आहे.

हे ही वाचा : बंद खोलीत महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत, दोन मुली पलंगावर मृतावस्थेत

कुठं सुरु आहे आंदोलन?

आजपासून (18 ऑगस्ट) मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील 42 कॅनेडी ब्रिजस्थित 'बेस्ट वर्कर्स युनियन'च्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू होईल. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर जोपर्यंत ठोस आणि सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील, असा ठाम इशारा सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. यावर आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.