Govt Jobs : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 2,482 पदांची भरती

मुंबई तक

• 04:49 PM • 18 Aug 2026

बँक ऑफ बडोदामध्ये 2,482 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. पदवीधरांना नोकरीची ही एक उत्तम संधी चालून आली आहे. यासाठी अर्ज कसा करावा, पगार किती मिळणार जाणून घ्या सविस्तर.

Bank Of Baroda Recruitment

Bank Of Baroda Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

point

बँक ऑफ बडोदामध्ये 2,482 पदांसाठी भरती सुरु

Bank Of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेने 'लोकल बँक ऑफिसर' (LBO) म्हणजेच स्थान‍िक बँक अधिकारी (JMG/S-I) या पदांच्या एकूण 2,482 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती अखिल भारतीय स्तरावर होत असून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा देण्याची संधी मिळणार आहे.

हे वाचलं का?

काय आहेत पात्रतेचे निकष?

या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. सीए (CA), कॉस्ट अकाउंटंट, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल पदवीधारक उमेदवार देखील या पदासाठी पात्र आहेत. याशिवाय, बँकेत काम केल्याचा किमान 1 वर्षाचा पदव्युत्तर अनुभव असणे अनिवार्य आहे. नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC), सहकारी बँका किंवा फिनटेक कंपन्यांमधील अनुभव यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच उमेदवाराला ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, तिथल्या स्थानिक भाषेचे (वाचन, लेखन, भाषण आणि समज) उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीत 10 धडाकेबाज निर्णय

अर्जाचे शुल्क काय?

वयोमर्यादेचा विचार केल्यास 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी 3 वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. अर्ज शुल्क म्हणून जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS) उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागेल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलता येणार, सुधारित प्रशासकीय नियम लागू

वेतन किती मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 रुपये ते 85,920 रुपये या वेतनश्रेणीनुसार (Pay Scale) आकर्षक पगार आणि इतर भत्ते मिळतील. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (bankofbaroda.bank.in) भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर आहे. सर्व पात्र आणि अनुभवी उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.