मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलता येणार, सुधारित प्रशासकीय नियम लागू
ministerial decisions new rules 2026 : महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस, 2026’ हे सुधारित प्रशासकीय नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हितासाठी मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार
सुधारित प्रशासकीय नियम लागू
ministerial decisions new rules 2026 : महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस, 2026’ या नावाने सुधारित प्रशासकीय नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा स्पष्ट कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे निर्णयात बदल केल्यास त्यामागील विशिष्ट कारणे लेखी स्वरूपात नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे निर्णय बदलण्याच्या अधिकारासोबत त्याची कारणमीमांसाही नोंदवावी लागणार आहे.
हेही वाचा : बायकोच्या गुप्तांगाला विजेचा शॉक देऊन संपवलं, 'त्या' कारणामुळे नवरा झाला क्रूर
मुख्यमंत्र्यांना कोणत्याही विभागाकडून कागदपत्रे मागवण्याचा अधिकार
नव्या नियमांनुसार संबंधित मंत्री आपल्या विभागाच्या दैनंदिन कामकाजाची आणि जबाबदाऱ्यांची हाताळणी करत राहतील. मात्र, मुख्यमंत्र्यांना कोणत्याही विभागाकडून अधिकृत कागदपत्रे, कागदपत्रांशी संबंधित नोंदी किंवा फाईल थेट मागवण्याचा औपचारिक अधिकार देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मागवलेली ही कागदपत्रे संबंधित विभागाचे मंत्री आणि त्यांचे सचिव विलंब न करता सादर करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असेल. याशिवाय मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्य सचिव आणि विभागीय सचिव यांच्या भूमिका, अधिकारांची मर्यादा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्याही या नव्या नियमांमध्ये स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : 44 वर्षीय हसीनाचे 23 वर्षीय तरुणासोबत अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या 40 वर्षीय पार्टनरची हत्या
