बायकोच्या गुप्तांगाला विजेचा शॉक देऊन संपवलं, 'त्या' कारणामुळे नवरा झाला क्रूर

मुंबई तक

एका व्यक्तीने आपल्या बायकोची निर्घृण हत्या केली आहे. बायकोने जमीन विकण्यास विरोध केला होता. त्यामुळे संतापून त्याने बायकोच्या गुप्तांगाला विजेचा शॉक दिला. उत्तर प्रदेशातील या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बायकोच्या गुप्तांगाला विजेचा शॉक देऊन संपवलं

point

'त्या' कारणामुळे नवरा झाला क्रूर

Crime News : मालमत्तेच्या वादातून एका महिलेची तिच्याच पतीने विजेचा शॉक देऊन अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नसीम नावाच्या या महिलेच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्या शरीरावर, विशेषतः गुप्तांगांवर विजेच्या शॉकमुळे झालेल्या गंभीर भाजल्याच्या खुणा स्पष्ट झाल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिचा पती इसरार याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील ही घटना आहे.

जमीन विकायला नकार दिला म्हणून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी इसरारने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. नसरीनला तिच्या पालकांकडून वारसा हक्काने मिळालेला एक जमिनीचा तुकडा विकायचा होता, परंतु नसरीनने त्याला स्पष्ट नकार दिला होता. या जमिनीची विक्री केल्यास तिच्या पाच मुलांच्या भविष्यावर संकट येईल, अशी भीती तिला वाटत होती. यावरून संतप्त झालेल्या इसरारने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हे ही वाचा : प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी रूपये मिळणार, रील पाहून आरोपीने मुलाचे गुप्तांग कापलं

नवरा करायचा शारीरिक अत्याचार

नसरीन आणि इसरार यांचा विवाह सुमारे 13 वर्षांपूर्वी झाला असून त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. नसरीनच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, या जमिनीच्या वादातून इसरार तिला वारंवार धमक्या देत असे आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करत असे. जमिनीची विक्री न केल्यास तिला मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. तिच्या बहिणीने, हसीन जहाँने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच नसरीनच्या चेहऱ्यावर जखमा होत्या, मात्र तिने कुटुंबापासून हा छळ लपवून ठेवला होता.

हे ही वाचा : 'आधी भांडी घासते, मग पाय दाबते...' नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले, 11 वर्षानंतर काय घडलं?

विजेचा शॉक देऊन हत्या

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या काकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येत तिच्या सासरच्या इतर लोकांचाही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात शरीरावर सहा ठिकाणी गंभीर दुखापती आणि विजेच्या शॉकमुळे भाजल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.