प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी रूपये मिळणार, रील पाहून आरोपीने मुलाचे गुप्तांग कापलं

मुंबई तक

crime news : प्रायव्हेट पार्ट विकल्यानंतर 1.20 कोटी रूपये मिळतील ही रील पाहून एक व्यक्ती प्रभावित झाला होता. रील पाहून एका व्यक्तीने 16 वर्षीय मुलाची हत्या करून त्याचे गुप्तांग विकण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलाची हत्या करून गुप्तांग विक्रीचा व्यवहार

point

मुलाचा प्रायव्हेट पार्टच गायब

Crime News : प्रायव्हेट पार्ट विकल्यानंतर 1.20 कोटी रूपये मिळतील ही रील पाहून एक व्यक्ती प्रभावित झाला होता. रील पाहून एका व्यक्तीने 16 वर्षीय मुलाची हत्या करून त्याचे गुप्तांग विकण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोपाळ येथील एका छोट्या तलावाजवळील आहे. मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असता, मृतदेह भोपाळच्या छोट्या तलावाच्या किनारी आढळून आला होता. मृत मुलाची ओळख रेहान अशी समोर आली. 

हे ही वाचा : Astrology : 'द्विद्वादश राजयोग' निर्मितीमुळे 'या' राशींचे नशीब चमकण्याची शक्यता

मुलाची हत्या करून गुप्तांग विक्रीचा व्यवहार

आरोपीने एका व्यक्तीला मुलाचे गुप्तांग विकण्यास जबरदस्ती केली होती, मात्र त्याचा व्यवहार झाला नाही. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपी अमिर कुरैशी (वय 18) आणि जोहेब खान (वय 20) यांना अटक करण्यात आलीय. रेहानची हत्या 6 ऑगस्ट रोजी झाली आणि चार दिवसानंतर म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी प्रेम मंदिराच्या किनारी धोबी घाट परिसरात मृतदेह आढळून आला होता. 

मुलाचा प्रायव्हेट पार्टच गायब

एका वृत्तमाध्यमानुसार, शवविच्छेदनानंतर माहिती समोर आली की, पोटासह पायावर गंभीर वार करत हत्या करण्यात आली होती. रेहानचा प्रायव्हेट पार्टच गायब करण्यात आला होता. आई राणी शाहने हातावरील टॅटूवरून आपल्या मुलाला ओळखले होते. 

हे ही वाचा : 'आधी भांडी घासते, मग पाय दाबते...' नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले, 11 वर्षानंतर काय घडलं?

आरोपींनी रेहानची हत्या करून त्याचे गुप्तांग कापून प्लास्टिक पिशवीत भरले. आरोपी जोहेबने ते गुप्तांग विकण्याचा प्रयत्न केला असता, मात्र त्याला यात कोणतेही यश आले नाही. जोहेबने ते गुप्तांगल आरोपीला परत केले आणि काहीच दिवसांत मृतदेह तलावात फेकून दिला.