Maharashtra Weather : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. याचा परिणाम हा राज्यातील काही जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून राज्यात संथ गतीने पाऊस पडताना दिसतोय. अशातच जाणून घेऊयात 21 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणा, सिझेरियननंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि रुमाल
कोकण
कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. थोडक्यात पावसाची साधारण स्थिती जाणवेल.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, लातर, नांदेड आणि हिंगोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांनी लेकीला दोन वेळा केलं प्रेग्नंट, पाप लपवण्यासाठी भयंकर कांड
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












