छत्रपती संभाजीनगर : कड्यावरून मुलाची आत्महत्या, वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही मारली उडी..VIDEO

मुंबई तक

21 Aug 2026 (अपडेटेड: 21 Aug 2026, 02:07 PM)

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचा मुलासह कड्यावरुन कोसळून मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर : कड्यावरून मुलाची आत्महत्या

point

वाचवताना वडिलांचा मृत्यू

point

पाठोपाठ आईनेही मारली उडी..VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील खवड्या डोंगरावर एक 18 वर्षीय मुलगा आत्महत्या करण्यासाठी गेला होता. यावेळी त्या मुलाला वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचा मुलासह कड्यावरुन कोसळून मृत्यू झाला आहे. वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर मुलगा व्यथित झाला होता. या प्रकरानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

हे वाचलं का?

तीन तास रंगला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांसोबत वाद झाल्याने हा मुलगा आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर गेला होता. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-वडीलदेखील आले होते. तो डोंगराच्या कड्यावर उभा असताना पोलीस आणि अग्निशमन दलही तिथे आले होते. वडील या मुलाला वाचवण्यासाठी गेले असता दोघंही कड्यावरुन खाली कोसळले. यामुळे धक्का बसलेल्या आईनेही कड्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

हे ही वाचा : राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या, कोणत्या मागणीसाठी झाले आक्रमक?

उपस्थितांनी काय सांगितलं?

तिसगावच्या माजी सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत हा थरार रंगला होता. तो मुलगा ऐकायला अजिबात तयार नव्हता. तो वारंवार जागा बदलत होता आणि आईसोबत बोलत होता. आईनेसुद्धा त्याला विनंती केली. मात्र तो काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीन नव्हता. जवळपास तीन तास आम्ही त्याला विनंती करत होतो. 

हे ही वाचा : हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक

'मला मरायचंच आहे'

यापुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, वडील त्या मुलाला धरायला गेले. मात्र दोघंही कड्यावरुन खाली कोसळले. हे पाहून त्याच्या आईनेदेखील उडी मारली. तू शिक्षित आहेस, आईकडे बघ. तुझं भविष्य बघ असं त्याला सांगितलं. मात्र त्यानं ऐकलं नाही आणि मला मरायचंच आहे असं तो म्हणत राहिला.