Jalna News : गौरव साळी - जालन्यात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झोका खेळताना गळफास लागल्याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश कृष्णा नेमाने या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जालन्यातली भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे रविवारी ही घटना घडली होती. या घटनेनं नेमाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
झोका घेताना प्रथमेशच्या गळ्याला बसला फास
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेशचे आई-वडील हे पाहुण्यांच्या भेटण्यासाठी मादणी येथे गेले होते. त्याचदरम्यान प्रथमेश आपल्या भावासोबत घरीच होता. प्रथमेश हा घरात झोक्याशी खेळताना गिरक्या घेत होता, याचदरम्यान त्याच्या गळ्याला फास लागल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्रथमेश हा जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता.
कमी वयात जबाबदारीची जाणीव
प्रथमेश हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती, कमी वयातच त्याला जबाबदारीची चांगली जाणीव होती. वडिलांच्या दुकानात तो मदतीला जात होता. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दुकान उघडणे, परिसराची स्वच्छता करणे अशी कामे तो करायचा.
हे ही वाचा : जुन्या वर्गमित्राकडून छळ, फोटो व्हायरलची धमकी.., शेवटी भयंकर घडलं!
लहान वयातच जबाबदारीने वागणाऱ्या प्रथमेशच्या अचानकपणे निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं ग्रामस्थांना मोठा हादरा बसला आहे. या घटनेनं संपूर्ण जळगाव सपकाळ परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT












