Govt Jobs : पदवीधरांना लाखो रुपये पगार देणार SBI, भरती सुरु, लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 04:46 PM • 18 Jun 2026

SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे? पगार किती मिळणार? जाणून घ्या सविस्तर.

SBI Recruitment

SBI Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांना लाखो रुपये पगार देणार SBI

point

भरती सुरु

point

लगेच करा अर्ज

SBI Recruitment : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभागाने 'प्रोबेशनरी ऑफिसर' (PO) पदांच्या एकूण 1500 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मेगा भरतीसाठी 18 जून पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 एप्रिल 2026 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचे तर, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात आहेत आणि ज्यांचा निकाल 30 सप्टेंबर पर्यंत जाहीर होणार आहे, ते देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. खुल्या (UR), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क असून, एससी (SC), एसटी (ST) आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबई हिरवीगार होणार! काय आहे महापौरांचा प्लॅन?

लाखो रुपये पगार

स्टेट बँक ऑफ इंडियामधील ही नोकरी अत्यंत प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या आकर्षक मानली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना 'JMGS-I' स्केलनुसार 48,480 रुपये सुरुवातीचे मूळ वेतन (Basic Pay) दिले जाईल. मुंबईसारख्या महानगराचा विचार केला तर सर्व भत्ते आणि सुविधा मिळून वार्षिक उत्पन्न (CTC) सुमारे 21.97 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे उत्तम वेतन आणि सुरक्षित करिअर शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 8 जुलै या अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.

हे ही वाचा : बंडखोरांना इंगा दाखवण्यासाठी ठाकरेंचं पहिलं पाऊल, दिल्लीत मोठ्या घडामोडी

'अशी' होणार परीक्षा

या भरतीची निवड प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना पूर्व परीक्षा (Prelims) द्यावी लागेल, ज्यामध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी (Mains) पात्र ठरतील. मुख्य परीक्षेनंतर अंतिम टप्प्यात सायकोमेट्रिक टेस्ट (Psychometric Test), गट चर्चा (Group Exercise) आणि मुलाखत (Interview) घेतली जाईल. या तिन्ही टप्प्यांच्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. उमेदवारांनी केवळ एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरायचे आहे. अधिक माहितीसाठी sbi.bank.in या वेबसाईटला भेट द्या.