Maharashtra Weather : राज्याच्या वेशीवर पाऊस धिंगाणा घालणार पण... IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 19 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यातील मान्सूनचा वेग मंदावला असून हवामानाच्या विभागानुसार, 19 जून 2026 रोजी राज्याच्या विविध भागांत प्रामुख्याने कोरडं आणि उष्ण हवामानाचा अंदाज आहे. अशातच काही विभागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावला

point

उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावल्याने राज्यातील बहुतांश भागांत उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढला आहे. मान्सूनचा प्रभाव हरणाई-सोलापूर पट्ट्यात रेंगाळल्याने राज्यात पावसाचा खंड पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, हवामानाच्या विभागानुसार, 19 जून 2026 रोजी राज्याच्या विविध भागांत प्रामुख्याने कोरडं आणि उष्ण हवामानाचा अंदाज आहे. अशातच काही विभागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: आईच्या लिव्ह-इन पार्टनरनं 3 वर्षांच्या चिमुकल्याची केली निर्घृण हत्या

कोकण 

पालघर, मुंबईमध्ये हिटव्हेव निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून यलो अलर्ट वर्तवला आहे. तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव परिसरात उष्णतेचा अधिकचा प्रभाव जाणवेल. नाशिकमध्ये कोरडं हवामानाची शक्यता आहे. दुपारनंतर नागरिकांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात आणि जिल्ह्यांत शुक्रवारी प्रामुख्याने अभाळ शुभ्र आणि निरभ्र राहील असा अंदाज आहे. दुपारनंतर सोलापूर भागात स्थानिक परिस्थितीमुळे पावसाच्या हलक्या सरींची यलो अलर्ट देण्यात आला. तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील परिसरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे, तसेच धाराशिव आणि लातूरचा पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. 

हे ही वाचा : खाकी वर्दीला बट्टा! तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

विदर्भ

विदर्भातील नागपूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली. नागपूरमध्ये कोरडं हवामान आणि कडक उन्हाचा चटका बसणार असल्याची शक्यता आहे. तसेच पूर्व किंवा मान्सूनच्या पावसाची मोठी शक्यता नसून हवामान उष्ण राहणार आहे.