परभणी: मंदिराच्या गाभाऱ्यात काळाचा घाला, एका क्षणात कसा गेला 6 जणांचा जीव?

मुंबई तक

20 Jun 2026 (अपडेटेड: 20 Jun 2026, 05:24 PM)

Parbhani Temple collapes : परभणीत दुपारी 3 वाजताच्या सुमारास मंदिराचे छत अचानकपणे कोसळले, या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. तर ज्यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. 

Parbhani Temple

Parbhani Temple

Google CTA

बातम्या हायलाइट

point

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात दुर्घटना

point

मंदिर कोसळून 40 - 50 भाविक ढिगाऱ्याखाली अडकले

Parbhani Temple Collapes : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील यशवाडी हनुमान मंदिराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी 20 जून 2026 रोजी हनुमंतरायाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांना प्रचंड गर्दी केली होती. याच दरम्यान, दुपारी 3 वाजताच्या सुमारास मंदिराचे छत अचानकपणे कोसळले, या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. तर ज्यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या दुर्घटनेत मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : परभणी: मंदिराच्या गाभाऱ्यात काळाचा घाला, एका क्षणात कसा गेला 6 जणांचा जीव?

40 - 50 भाविक ढिगाऱ्याखाली अडकले

घडलेल्या घटनेनुसार, काही दिवसांपासून मंदिराचे काम सुरू होते, बांधकाम सुरू असताना मंदिराचा काही भाग अचानकपणे कोसळला आणि भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. याच दुर्घटनेत 40 - 50 भाविक ढिगाऱ्याखाली अडकले होते. यानंतर भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

सध्या अजूनही बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येते. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची अधिकची शक्यता आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच पालमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली. तसेच बचावकार्यास स्थानिक प्रशासन आणि अपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.  

हे ही वाचा : सांगली: केबिनमध्ये तासाला 300 ते 800 रुपयांचा रेट, कचरापेटीत कंडोम अन्..

रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, महसून प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीत हाताळण्याचे काम केले. नागरिकांनी काही भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास यश मिळवले. या कठिण प्रसंगात गावातील नागरिकांना अवाहन करून नातेवाईकांची तातडीने विचारपूस करून सहकार्य केले जात आहे.