Maharashtra Weather : जून महिना संपत आला, मान्सून कधी बरसणार धो धो? 17 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 23 Jun 2026

Maharashtra Weather : जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सून हजेरी लावतो, मात्र यंदा जून महिना संपत आला तरीही अद्याप मान्सून म्हणावा असा सक्रिय दिसून येत नाही. 23 जून 2026 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

यंदा जून महिना संपत आला तरीही अद्याप मान्सून म्हणावा असा सक्रिय नाही

point

23 जून 2026 रोजी राज्यातील हवामान कसं असेल?

Maharashtra Weather : जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सून हजेरी लावतो, मात्र यंदा जून महिना संपत आला तरीही अद्याप मान्सून म्हणावा असा सक्रिय दिसून येत नाही. रविवारी राज्यातील काही भागांत झालेल्या पावसानंतर वातावरणात बदल जाणवताना दिसून येतोय. काही ठिकाणी पावसासाठी पोषक असं वातावरण आहे. 23 जून 2026 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  "ओमराजे रिलस्टार नाही, तर...", एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

कोकण 

कोकण विभागात पावसाचा अधिक जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपात पाऊस हजेरी लावणार आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वाऱ्याच्या वेगासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज राहील अशी शक्यता वर्तवली. तर सातारा, आणि घाटमाथा परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगावात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. 

हे ही वाचा :  पुण्यात 'या' भागांत पावसाची जोरदार बॅटिंग, कुमशेत परिसरात ढगफुटी सदृश्यस्थिती

विदर्भ 

विदर्भ विभागात पावसाहून उष्णतेचा अधिक प्रभाव दिसून येतो. अकोला, वाशिम, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. तर अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत उष्णतेची अधिक तीव्रता राहण्याचा अंदाज आहे, याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.