मुंबईची खबर : मुंबईकरांनो पुढील तीन तास महत्त्वाचे, जोरदार पाऊस बरसणार; अलर्ट जारी

मुंबई तक

• 11:34 AM • 23 Jun 2026

आज (23 जून) सकाळपासूनच मुंबईच्या अनेक भागांत पावसाने अतिशय दमदार हजेरी लावली आहे. कालदेखील मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत.

Mumbai Rains

Mumbai Rains

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईकरांनो पुढील तीन तास महत्त्वाचे

point

जोरदार पाऊस बरसणार

point

अलर्ट जारी

Mumbai Rains : अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. आज (23 जून) सकाळपासूनच मुंबईच्या अनेक भागांत पावसाने अतिशय दमदार हजेरी लावली आहे. कालदेखील मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या होत्या, ज्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. आज सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पुढील तीन तास महत्त्वाचे

हवामान खात्याने आज दिवसभरात मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाची शक्यता वर्तवली असून संपूर्ण मुंबईसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या तीन तासांत मुंबईत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा  : Inside Story : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?

मुंबईकरांना दिलासा

वाढत्या उष्णतेने आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने मुंबईवर पाणीकपातीचे मोठे संकट घोंगावत होते. मात्र, पावसाने जोरदार सुरूवात केल्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्याची आशा निर्माण झाली असून मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : Pune Metro : अगरबत्तीचे चटके, नातीसोबत लैंगिक संबंध आणि कोर्टाच्या फेऱ्या

छत्री, रेनकोट सोबत ठेवा

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आणि पावसाचा वाढता जोर पाहता प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून महापालिका आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत.