Pune Metro : अगरबत्तीचे चटके, नातीसोबत लैंगिक संबंध आणि कोर्टाच्या फेऱ्या

ओमकार वाबळे

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 01:21 PM)

पुण्यातील 'पुरुष स्वाभिमान फाउंडेशन' ही कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि पत्नी पीडित पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी एक प्रमुख पुरुषांची संघटना आहे. नुकताच पुण्यात या संघटनेतर्फे पत्नी पीडित पुरुषांचा एक भव्य महामेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात राज्यभरातून हजारो पुरुष एकत्र आले होते.

Pune Metro

Pune Metro

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अगरबत्तीचे चटके

point

नातीसोबत लैंगिक संबंध आणि कोर्टाच्या फेऱ्या

point

पुण्यात 2700 पुरुष एकत्र येण्याचं कारण काय?

Pune Metro : प्रख्यात लेखक व.पु. काळे यांच्या "पुरुषांनाही त्यांच्या व्यथा असतात आणि त्यांना त्यांच्यावरती उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती हवी असते" या मार्मिक विधानाचा संदर्भ देत आजच्या समाजातील पुरुषांच्या छुप्या वेदनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या भारतीय समाजात आज पुरुषांनाही स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी संघटित व्हावे लागत आहे. 'पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून हजारो पीडित पुरुष एकत्र आले असून, कौटुंबिक वादातून उद्भवणाऱ्या कायदेशीर लढाईत एकमेकांना मानसिक आणि कायदेशीर आधार देत आहेत. कौटुंबिक न्यायालयात किंवा पोलीस ठाण्यात प्रकरण जाण्यापूर्वी जोडप्यांमध्ये समेट घडवून आणण्यावर या संस्थेचा मुख्य भर असून, सध्या 2,700 हून अधिक पुरुष कायदेशीर केसेसचा सामना करत या संस्थेशी जोडले गेले आहेत.

हे वाचलं का?

पैशांसाठी पुरुषांवर केसेस

महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप या पीडित पुरुषांनी केला आहे. हुंडाबळी (498 अ) आणि घरगुती हिंसाचार यांसारख्या कायद्यांनुसार सुरुवातीला दाखल होणारे खटले आता थेट विनयभंग, बलात्कार आणि अत्यंत गंभीर अशा 'पॉक्सो' (POCSO) कायद्यापर्यंत पोहोचत आहेत. केवळ तडजोडीसाठी किंवा पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरुषांवर आणि त्यांच्या वृद्ध आई-वडिलांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबे नैराश्याच्या गर्तेत ढकलली जात आहेत. समाजात महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण तीन पटीने जास्त असून, दर सात मिनिटाला एक पुरुष कौटुंबिक तणावातून आत्महत्या करत असल्याची धक्कादायक आकडेवारी यावेळी मांडण्यात आली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : जून महिना संपत आला, मान्सून कधी बरसणार धो धो? 17 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

पुरुषांनी वाचला अन्यायाचा पाढा

या मुलाखतीदरम्यान अनेक पुरुषांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. एका सदस्याने सांगितले की, विसंवादामुळे त्याच्या मुलाला त्याच्यापासून लांब नेऊन पैशांसाठी ब्लॅकमेल केले गेले, तर एका ज्येष्ठ मातेने आपल्या आयटी क्षेत्रात असलेल्या मुलाचा संसार सासरच्या अतिहस्तक्षेपामुळे मोडल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर सुनेच्या त्रासामुळे स्वतःचे हक्काचे घर सोडून भाड्याच्या घरात राहावे लागलेल्या एका कुटुंबातील क्लास वन ऑफिसर असलेल्या पतीवर दोन वर्षांच्या नातीचा वापर करून 'पॉक्सो' अंतर्गत खोटी केस दाखल करण्यात आल्याची अत्यंत वेदनादायी कहाणी समोर आली. स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसे पुरावे असूनही केवळ महिलाधार्जिण्या कायद्यांमुळे आणि राजकीय दबावामुळे पुरुषांना अनेक महिने पोलीस आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?

नपुंसकत्त्वाचे खोटे आरोप

न्यायालयाकडून मिळणाऱ्या एकतर्फी पोटगीच्या (मेंटेनन्स) आदेशांमुळे गंभीर आजारपण असतानाही पुरुषांना तुरुंगवास भोगावा लागत असल्याचा अनुभव एका प्राध्यापकाने मांडला, ज्यांच्यावर 12 वर्षांच्या संसारानंतर आणि दोन मुले झाल्यानंतरही पत्नीने नपुंसकत्वाचे खोटे आरोप केले होते. केवळ पैशांच्या हव्यासापोटी 99 टक्के प्रकरणांमध्ये या कायद्यांचा खेळ मांडला जात असून नातेसंबंधांमधील भावना संपल्याचे मत पीडितांनी व्यक्त केले. व्हिडिओच्या शेवटी व.पु. काळेंचे अपूर्ण वाक्य पूर्ण करताना, "पुरुषांनाही त्यांच्या व्यथा असतात, त्यांनाही त्यांच्यावरती उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती हवी असते; उडून जाणारे अत्तर त्यांना आवडत नाही," असे सांगत नातेसंबंधांमधील प्रामाणिकपणा नष्ट होऊन त्याचे रूपांतर केवळ आर्थिक भांडवलशाहीत होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.