Government Jobs : आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' (MDL) मध्ये रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. माझगाव डॉकने विविध ट्रेडसाठी 'ट्रेड अप्रेंटिस' (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 495 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या आयटीआय (ITI) उत्तीर्ण तरुणांनासाठी ही सुवर्णसंधी आहे.
ADVERTISEMENT
काय आहेत पात्रतेचे निकष?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेडमध्ये किमान 50% गुणांसह आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची कोणतीही अट नसून, ते केवळ उत्तीर्ण श्रेणीत असले तरीही या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी mazagondock.in या वेबसाईटला भेट द्यावी.
हे ही वाचा : 18.5 कोटींचा निधी मंजूर झाला? त्याचं काय केलं? ओमराजे निंबाळकर म्हणाले...
अर्जाची शेवटची तारीख अन् शुल्क
भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवारांना 1 जुलै 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येतील. अर्ज शुल्काबाबत सांगायचे तर, जनरल (General), ओबीसी (OBC), एसईबीसी (SEBC), ईडब्ल्यूएस (EWS) आणि एएफसी (AFC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आकारली जाणार आहे. तर दुसरीकडे, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना या अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे, म्हणजेच त्यांच्यासाठी कोणतीही फी असणार नाही.
हे ही वाचा : 'नार्वेकरांनी आशाताईंच्या नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, त्यापेक्षा हिब्रूमध्ये... राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट
परीक्षा कधी होणार?
निवड प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र 15 जुलै रोजी उपलब्ध करून दिले जाईल, तर अधिकृत परीक्षा 25 जुलै रोजी घेतली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











