नागपूर: 14 वर्षीय मुलासोबत मदरशात अनैसर्गिक कृत्य, इतर काही मुलं..

योगेश पांडे

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 02:54 PM)

Nagpur crime : नागपूरच्या ताजबाग परिसरात असलेल्या दारूल मरूल मदरशात एका 14 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला. नंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. ही घटना 20 जून रोजी घडली होती. मदरशातील एका मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यानं परिसर पूरता हादरून गेला होता.

Nagpur crime

Nagpur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

14 वर्षीय विद्यार्थ्याला हवसचं शिकारी बनवलं

point

आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Nagpur Crime : नागपूरच्या ताजबाग परिसरात असलेल्या दारूल मरूल मदरशात एका 14 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला. नंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. ही घटना 20 जून रोजी घडली होती. मदरशातील एका मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यानं परिसर पूरता हादरून गेला होता. आरोपीची ओळख अताय रसूल उर्फ तानीफ अशी पटली. हा मूळचा बिहार येथील रहिवासी आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 17 वर्षीय भाच्याकडून महिला गरोगर राहिली अन् म्हणाली...

14 वर्षीय विद्यार्थ्याला हवसचं शिकारी बनवलं

पोलिसांच्या माहितीनुसार, मदरशात 10 विद्यार्थी धर्माचं ज्ञान घेत होते. तो देशातील विविध भागात राहत होते. मदरशात मुलांना शिकवणारा मौलानाचा साथीदार असलेला अताय रसूल उर्फ तानीफ हा बिहारचा असल्याने त्याचं सारखं येणं जाणं असायचं. मात्र, त्याने मदरशात राहून 14 वर्षीय विद्यार्थ्याला आपल्या हवसचं शिकारी बनवलं, नंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. 

आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तानीफ विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलाला बाल संरक्षण सेवेकडे पाठवण्यात आले आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशातच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे या घटनेची तक्रार आली होती.  

हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

मजरशात अशा घटना घडू लागल्याचे पाहून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात लहान मुलासोबत घडलेल्या घटनेची पुष्टी केली जात आहे. असे इतरही मुलं पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी प्रकरणाची माहिती जाणून घेत तपास सुरु ठेवला.