विश्वास नांगरे-पाटलांची मुंबईवरून थेट 'या' शहरात बदली, पाहा कोणतं मिळालं पद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

vishwas nangare patil, nagpur city police commissioner, vishwas nangare patil transfer, IPS Vishwas Nangare Patil UPSC rank, Vishwas Nangare Patil books, Vishwas nangare nashik,

विश्वास नांगरे-पाटील

योगेश पांडे

• 09:01 PM • 23 Jun 2026

follow google news

मुंबई: महाराष्ट्र शासनाने अप्पर पोलीस महासंचालक (ADG) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर अप्पर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या पदावर कार्यरत असलेले विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

या नियुक्तीमुळे पुन्हा एकदा विश्वास नांगरे-पाटील चर्चेत आले असून, राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.

कोण आहेत विश्वास नांगरे-पाटील?

विश्वास नांगरे-पाटील हे भारतीय पोलीस सेवेचे (IPS) 1997 बॅचचे अधिकारी आहेत. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या नांगरे-पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मानली जाते.

हे ही वाचा>> पुण्याची सिया इंदूरच्या सोनमसारखीच.. लोहगड, दरी अन्... बॉयफ्रेंडच्या नादापायी केतनला धाडलं यमसदनी!

'सिंघम' अधिकारी म्हणून ओळख

विश्वास नांगरे-पाटील यांना महाराष्ट्रातील 'सिंघम' अधिकारी म्हणूनही ओळखले जाते. गुन्हेगारी विरोधातील कठोर भूमिका, निर्भीड कार्यपद्धती आणि जनसामान्यांशी थेट संवाद यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच संघटनात्मक कामकाजातही त्यांची विशेष छाप राहिली आहे.

26/11 हल्ल्यावेळी दाखवलेले धाडस

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी विश्वास नांगरे-पाटील यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. त्या वेळी ते मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत होते. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या कामगिरीमुळे त्यांचे नाव राज्यभर पोहोचलेले.

प्रेरणादायी वक्ते म्हणूनही लोकप्रिय

पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतानाच विश्वास नांगरे-पाटील हे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वक्ते म्हणूनही लोकप्रिय आहेत. स्पर्धा परीक्षा, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशाचा मंत्र यावर त्यांची व्याख्याने मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. त्यांनी लिहिलेले "मन में है विश्वास" हे पुस्तकही तरुणांमध्ये लोकप्रिय ठरले आहे.

हे ही वाचा>> भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..

नागपूरची जबाबदारी का महत्त्वाची?

नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानी शहर असून राज्यातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या पोलीस आयुक्तालयांपैकी एक मानले जाते. राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या या शहराची कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आता विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कठोर प्रशासकीय शैलीचा नागपूर पोलीस दलाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शासनाचा आदेश

महाराष्ट्र शासनाने 23 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, डॉ. रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. 

या बदल्यांमुळे राज्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल झाले असून, नागपूरमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.