LPG Gas Cylinder : घर बसल्या मिळवा सिलेंडर, रांग वैगरे लावायची नाही.. फक्त करा 'एकच' गोष्ट

LPG gas cylinder : आपल्या घरात जर एलपीजी गॅस सिलिंडर संपणार असतील, तर आता सिलिंडर बुक करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही. इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस कॉल,एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि मोबाईल अॅप्ससह विविध माध्यमांद्वारे सिलिंडर बुकींचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

LPG Gas Cylinder

LPG Gas Cylinder

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 07:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फोनद्वारे एलपीजी सिलिंडर कसा बुक करता येईल? 

point

व्हॅट्सअॅपद्वारे एलपीजी बुकींग करण्यासाठी नंबर खालीलप्रमाणे

LPG gas cylinders : आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा आघात झाला आहे. सिलिंडर बुक करणं कठीण होऊन बसलं आहे. ग्राहकांना सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. पण आता एका गोष्टीमुळे ग्राहकांना रांगा लावण्याची अजिबात गरज नाही. इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस कॉल,एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि मोबाईल अॅप्ससह विविध माध्यमांद्वारे सिलिंडर बुकींचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडेच अनेक भागांमध्ये एलपीजी बुकींग प्रणालीवर मोठा भार वाढल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूर : जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड, मध्यरात्री घरात घुसून पुतण्यांकडून काका-काकीची निर्घृण हत्या

अॅप आणि कॉल सेवेमध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. फोनवरून बुकींग करणे शक्य नसल्यास, तुम्ही इतर पद्धतीचा वापर करू शकता. अशातच फोनद्वारे एलपीजी सिलिंडर कसा बुक करता येईल हे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. 

फोनद्वारे एलपीजी सिलिंडर 'असा' बुक करता येईल? 

एलपीजी गॅस कनेक्शन असल्यास, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवरून 88888 23456 या IVRS नंबरवर कॉल करून सिलिंडर बुकींग करू शकता. 94936 02222 नंबरवर मिस कॉल देऊनही बुकींग करता येतं. भारत गॅस ग्राहकांसाठी 77150 12345 किंवा 77180 12345 या क्रमांकावर फोन करून एलपीजी गॅस रिफिल बुकींग करू शकता. इंडेन गॅसच्या वापरकर्त्यांसाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल करून किंवा एसएमएस पाठवून सिलेंडर बुक करू शकतात. 

व्हॅट्सअॅपद्वारे एलपीजी बुकींग करण्यासाठी नंबर खालीलप्रमाणे

इंडेन गॅस  व्हॅट्सअॅप : 75888 88824 

एचपी गॅस व्हॅट्सअॅप : 92222 01122

या व्हॅट्सअॅप क्रमांकावर हाय किंवा रिफील असा मेसेज करू शकता. 

हे ही वाचा : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर क्रूजरचा टायर फुटून भीषण अपघातात चेंदामेंदा, तिघांचा करुण अंत

मोबाईल अॅपद्वारे देखील गॅस बुकींग करू शकता.

इंडेन गॅस App

एचपी गॅस App

Bharat Gas: Hello BPCL app वरून देखील ग्राहक फोन करून एलपीजी गॅस बुकींग करू शकतात. 

    follow whatsapp