Government Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या 'द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड' (NIACL) या विमा कंपनीने प्रशिक्षणार्थी (Apprentice) भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. याअंतर्गत एकूण 550 प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. या प्रशिक्षणाचा एकूण कालावधी 12 महिन्यांचा असणार आहे. या सुवर्णसंधीमुळे विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांना एका प्रतिष्ठित सरकारी कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
ADVERTISEMENT
अर्ज करण्याची अंतिम मुदत
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 23 जून पासून अधिकृतपणे सुरू झाली असून, अर्ज करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 6 जुलै पर्यंत आहे. या भरतीची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया 'बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेमार्फत राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी 12 जुलै रोजी ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल. विशेष म्हणजे उमेदवारांना ही परीक्षा घरबसल्या देण्याची सवलत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी कंपनीच्या www.newindia.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे ही वाचा : संजय दीना पाटलांची पत्रकारांना धमकी, एकनाथ शिंदेंकडून सारवासारव
'इतके' मानधन मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,300 रुपये निश्चित मानधन (Stipend) दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास, अर्जदार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. पदवीधरांसाठी ही उत्तम संधी आहे.
हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..
'ही' अट महत्त्वपूर्ण
असे असले तरी कंपनीने यासाठी एक महत्त्वपूर्ण अट ठेवली आहे. उमेदवाराच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची तारीख ही 1 जानेवारी 2022 ते 1 जून 2026 या कालावधीतीलच असणे बंधनकारक आहे. म्हणजेच, ज्या उमेदवारांनी 1 जानेवारी 2022 पूर्वी किंवा 1 जून 2026 नंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.
ADVERTISEMENT











