सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..

इम्तियाज मुजावर

• 02:31 PM • 25 Jun 2026

Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशानाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या धावलेल्या नातवाचा आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. 

satara news

satara news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेळीला वाचवण्यासाठी मुलगा गेला, आजी वाचवायला गेली दोघांचाही दुर्दैवी मृत्यू 

point

शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू

Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशानाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या धावलेल्या नातवाचा आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरेल

शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू

मार्जी गावातील काळेवस्ती परिसरात दुपारी दीडच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत पावलेल्या वृद्ध महिलेची ओळख मालन विलास काळे (वय 60) अशी पटली आहे. नातू सुजित युवराज काळे (वय 13) याच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती. 

शेळीला वाचवण्यासाठी मुलगा गेला, आजी वाचवायला गेली दोघांचाही दुर्दैवी मृत्यू 

संबंधित दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला, नंतर तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता. आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने शॉक बसला, शेळीसह आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हातात हात घेऊन बसलेली आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून नागरिकांचे डोळे पाणावले.  या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हे ही वाचा : चिमुरडीवर 39 मिनिटे अत्याचार, 18 जखमा; नसरापूर बलात्कार प्रकरणात कोर्टात काय घडलं?

संबंधित घटनेची माहिती मिळताच, दहिवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, प्रकरणाता नेमका निष्काळजीपणा कोणाचा? याबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागलेली आहे.