कोल्हापूर: नारळाचं झाड घरावर कोसळलं, झोपलेल्या 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

Kolhapur Accident : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरासमोर वाळलेलं नारळाचं झाड अचानकपणे घरावर कोसळलं आणि छतावरील पत्रा फोडून झाडाचा बुंधा झापलेल्या मुलाच्या अंगावर पडला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.

Kolhapur Accident

Kolhapur Accident

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 09:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नारळाचं झाड पत्रा फोडून घरावर पडलं

point

आयुषचा दुर्दैवी मृत्यू 

Kolhapur Accident : दिपक सूर्यवंशी - कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरासमोर वाळलेलं नारळाचं झाड अचानकपणे घरावर कोसळलं आणि छतावरील पत्रा फोडून झाडाचा बुंधा झापलेल्या मुलाच्या अंगावर पडला.  या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून  मृत मुलाची ओळख आयुष (वय 10) अशी पटली आहे. या घटनेनं कागल तालुका हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई लोकलमध्ये मर्डर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं

नारळाचं झाड पत्रा फोडून घरावर पडलं

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील लखन दादू सकट यांच्या घरासमोर एक नारळाचं झाड सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरावर कोसळलं. अशावेळी घरात आयुष, आई काजल आणि वडील अक्षय चौगुले हे झोपले होते. त्याचदरम्यान नारळाचं खोड थेट घरावर कोसळलं. घराचा पत्रा फुटून झाड झोपलेल्या आयुषच्या अंगावर कोसळलं. 

आयुषचा दुर्दैवी मृत्यू 

या दुर्घटनेत आयुष गंभीर जखमी झाला, त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. ग्रामस्थांनी त्याला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष हा त्याचा एकुलता एक मुलगा होता. आयुष हा काजल चौगुले यांचा एकुलता एक मुलगा होता. 

हे ही वाचा : मुंबई: महिलेचा लग्नास नकार, होणाऱ्या सुनेनं सासूचे मॉर्फ फोटो व्हायरल केले अन्..

मृत आयुष हा मूळचा कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरातील असून शिक्षणासाठी तो आपले आजोबा सकट यांच्याकडे सिद्धनेर्ली येथे वास्तव्यास होता. तो इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. कागल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद नोंदवण्यात आली.