बीड: 16 वर्षीय मुलगी दळण आणायला गेली, रस्त्यात गाठून खोलीत नेलं अन् दोनदा..

मुंबई तक

• 01:45 PM • 24 Jun 2026

Beed crime : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मन माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी ही घरातून दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असताना हा प्रकार घडला. मुलीला रस्त्यात अडवून तिला घरात नेले.

Beed crime

Beed crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडच्या अंबाजोगाईत 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

point

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली 

Beed Crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मन माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी ही घरातून दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असताना हा प्रकार घडला. मुलीला रस्त्यात अडवून तिला घरात नेले. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला बेदम मारहाण केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. यानंतर पीडितेनं कसाबसा घटनास्थळावरून घराकडे पळ काढला. आरोपीची ओळख रमेश्वर बंडू असल्याचं समजतंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : व्यतिपात योगाची निर्मिती होणार, 'या' राशींवर मोठे आर्थिक संकट घोंघावणार

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली 

पीडितेनं आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला होता. संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तात्काळपणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेतली, नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटना समजून घेतली आणि तक्रार नोंदवून घेतली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिराने आरोपी रमेश्वर बंडे विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केले, असून पोलीस या प्रकरणाचा पुढील शोध घेत आहेत. 

हे ही वाचा : कुटुंबियांचा विरोध झुगारुन प्रेमविवाह, 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन गावात आले, अन् गेम झाला!

केवळ बीडच नाही,तर राज्यासह देशभरात महिलांवर अन्याय लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू लागलेल्या आहेत. यामुळे महिला आणि मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कायदा आणि प्रशासनाने अशा सातत्याने घडत असलेल्या घटनांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.