केतन अग्रवालची हत्या करणारी सिया गोयल नेमकी आहे तरी कोण?

केतन अगरवालच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी बायको सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. या हत्येनंतर सिया गोयल कोण आहे असा प्रश्न विचारला जात आहे.

Who is Siya Goyal

Who is Siya Goyal

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 01:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

point

सिया गोयल नेमकी आहे तरी कोण?

Who is Siya Goyal : सगळीकडे खळबळ उडवून देणाऱ्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी बायको सिया गोयल हिच्याबद्दल आता नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका व्यापारी कुटुंबातील असलेल्या सियाने आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी रचलेला कट थक्क करणारा आहे. या हत्याकांडानंतर आता सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात आहे की, नक्की कोण आहे ही सिया गोयल आणि तिने हे टोकाचे पाऊल का उचलले?

हे वाचलं का?

शिक्षण अर्धवट सोडून बेकरी व्यवसायात प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल हे ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचे मोठे व्यापारी आहेत. घरात आर्थिक सुबत्ता असतानाही सियाचे लक्ष शिक्षणात फारसे रमले नाही. तिने 'बीबीए'च्या (BBA) प्रथम वर्षानंतर आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले. शिक्षण सोडल्यानंतर तिने स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला. याच बेकरी व्यवसायाच्या निमित्ताने तिची ओळख चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी झाली, जी पुढे केतनच्या हत्येचे मुख्य कारण ठरली.

हे ही वाचा : मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, 'त्या' कारणावरुन वाद अन्..

प्रेमसंबंध आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी

सियाचा प्रियकर चेतन चौधरी याचे वडील बाबूलाल चौधरी हे देखील ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचेच व्यापारी आहेत. विशेष म्हणजे, चेतननेही सियासारखेच आपले 'बीबीए'चे शिक्षण अर्धवट सोडले होते. समान पार्श्वभूमी आणि व्यवसायाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रूपांतर लवकरच त्यांच्यातील जवळीकीत झाले. केतनशी लग्न ठरलेले असतानाही सिया आणि चेतन यांच्यात वेगळेच सूत जुळले होते, ज्यातूनच त्यांनी केतनचा गेम करण्याचा भयानक कट रचला.

हे ही वाचा : Pune Metro : बालीची ट्रिप, लोहगडावर प्रीवेडिंग शूट आणि क्रिकेटर बॉयफ्रेंड...

बालीचा 'प्री-वेडिंग' प्लॅन अन् घातपात

केतन हा अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आला होता. त्यानंतर तो रियल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून काम पहात होता. अशा उच्चशिक्षित केतनचा आणि सियाचा साखरपुडा झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात ते दोघे 'प्री-वेडिंग' शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. मात्र, याच दरम्यान केतनचा पासपोर्ट अचानक गहाळ झाला आणि त्यांचा बालीचा प्लॅन रद्द झाला. हा पासपोर्ट गहाळ होण्यामागे आणि प्लॅन रद्द होण्यामागे काही घातपाताचा संशय होता का, तसेच यातूनच पुढे हत्येचा अंतिम कट कसा अंमलात आणला गेला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.