Govt Jobs : रेल्वेकडून पदवीधरांसाठी मोठी भरती, काय आहेत निकष? बक्कळ पगार अन्...

रेल्वेकडून पदवीधर तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सेक्शन कंट्रोलर या पदासाठी होणाऱ्या या भरतीसाठी पात्रतेचे काय निकष आहेत, जाणून घेऊया.

Railway Recruitment

Railway Recruitment

मुंबई तक

• 04:45 PM • 24 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : रेल्वेकडून पदवीधरांसाठी मोठी भरती

point

काय आहेत निकष?

point

बक्कळ पगार अन्...

Railway Recruitment : रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे बोर्डाने 'सेक्शन कंट्रोलर' (Section Controller) पदांच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया 15 जुलै पासून तात्पुरत्या स्वरूपात (Tentative) सुरू होण्याची शक्यता असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 असणार आहे.

हे वाचलं का?

वेतन किती मिळणार?

या पदासाठी निवडक उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 'पे लेव्हल 6' अंतर्गत 35,400 रुपयांचे प्रारंभिक मूळ वेतन आणि इतर भत्ते दिले जातील. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे. पदवीधर तरुणांसाठी रेल्वे प्रशासनात अधिकारी स्तरावर काम करण्याची ही एक उत्तम आणि सन्मानजनक संधी मानली जात आहे.

हे ही वाचा : मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद, तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

पात्रतेचे निकष

वयोमर्यादेच्या अटीनुसार, उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल. याशिवाय, रेल्वेच्या कठोर नियमांनुसार उमेदवाराची शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता तपासली जाईल. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.

हे ही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!

'इथे' करावा अर्ज

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. भरती संदर्भातील सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि अधिकृत अपडेट्ससाठी उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज करण्याची लिंक वेळेत सक्रिय केली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावेत.