मुंबईची खबर : मुंबईतील 'या' झोपडपट्ट्यांविषयी महत्त्वाचा निर्णय, लवकरच होणार कायापालट

मुंबईतील तीन झोपडपट्टी भागांचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने याविषयीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 04:08 PM • 25 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील 'या' झोपडपट्ट्यांविषयी महत्त्वाचा निर्णय

point

लवकरच होणार कायापालट

Mumbai News : मुंबईतील तीन मोठ्या झोपडपट्टी भागांचा पुनर्विकास महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी समूह (क्लस्टर) पुनर्विकास योजनेअंतर्गत लवकरच केला जाण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (SRA) यासंदर्भात जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी, वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा आणि वडाळा येथील ट्रक टर्मिनल क्षेत्राच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

हे वाचलं का?

'या' झोपडपट्टी भागांचा होणार पुनर्विकास

हा प्रस्तावित प्रकल्प 101 एकर क्षेत्रफळाच्या जुहू लेन-गिल्बर्ट हिल प्रकल्पांतर शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनांपैकी एक आहे. हे तिन्ही भाग मिळून एकूण 850 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले आहेत. यामध्ये वडाळा येथील अँटॉप हिल या पहिल्या समूहाचा (क्लस्टर) समावेश असून, हे क्षेत्र सुमारे 450 एकरांवर पसरलेले आहे आणि त्यात 65,000 झोपड्या आहेत. दुसरा भाग जोगेश्वरी पूर्व येथील माजसवाडीचा आहे, जो सुमारे 260 एकरांवर पसरलेला असून त्यात 50,000 झोपड्या आहेत.

तिसरा भाग वांद्रे पूर्व येथील बेहरामबागचा असून तो 140 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे आणि त्यात जवळपास 12,000 झोपड्या आहेत. असे असले तरी या प्रकल्पांच्या अचूक सीमा आणि त्यात समाविष्ट होणाऱ्या एकूण झोपड्यांची अंतिम संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..

मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (SRA) या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. आता या प्रस्तावांवर राज्य सरकारच्या समूह पुनर्विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विचार केला जाईल. महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये या झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेची सुरुवात केली होती.

हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

पुनर्वसनाची घरे मोफत

या योजनेअंतर्गत पात्र झोपडीधारकांना पुनर्वसनाची घरे मोफत दिली जाणार आहेत. या प्रकल्पांच्या कामासाठी विकासकांमध्ये (डेव्हलपर्स) निविदा प्रक्रियेद्वारे स्पर्धा होईल. जो विकासक झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला (SRA) सर्वाधिक जमीन प्रीमियम देईल, त्याला या प्रकल्पाचे पुनर्विकास हक्क आणि त्यासोबतच विक्री घटकाचा  अधिकार दिला जाईल. SRA अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईला 2050 पर्यंत झोपडपट्टी मुक्त बनवण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे.