Jalna Crime : गौरव साळी - जालन्यात दारूच्या त्रासाला कंटाळून आई आणि लहान भावाने मिळून सख्ख्य़ा थोरल्या भावाचा दुर्दैवी खून केला. या धक्कादायक घटनेनं जालना शहरातील चंदनझिरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश भगवान शिंदे अशी मयत व्यक्तीची ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'परत आला तर मारुन पाठवणार...' खासदार संजय दीना पाटलांची पत्रकारांना थेट धमकी
प्रकाशच्या त्रासाला कंटाळून आई आणि लहान भावानं तरुणाला संपवलं
घडलेल्या घटनेनुसार, प्रकाश शिंदे याला दारू पिण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो कुटुंबियांना सतत त्रास देत असायचा अशी माहिती समोर आली आहे. प्रकाशच्या त्रासाला कंटाळून आई शांताबाई भगवान शिंदे आणि लहान भाऊ दीपक भगवान शिंदे यांनी मिळून प्रकाश शिंदेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश शिंदे या थोरल्या सख्ख्या भावाचा दुर्दैवी अंत झाला.
माय लेकरांनी मिळून तरुणावर दांडक्याने केला हल्ला
संतापलेल्या माय लेकरांनी थोरल्याच मुलावर दांडक्याने हल्ला केला. हल्ला इतका जोराचा होता की, त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. अशातच मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतलं.
हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..
पोलिसांनी आई शांताबाई भगवान शिंदे आणि लहान भाऊ दीपक शिंदे यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या घटनेनं चंदनझिरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











