Maharashtra Weather : राज्याला मान्सून झोडपणार, 'या' 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 26 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत पावसाच्या सरींनी दमदार हजेरी लावली. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच 26 जून 2026 रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील विविध भागांत मान्सूनच्या सरींनी जोरदार हजेरी लावली

point

23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत पावसाच्या सरींनी दमदार हजेरी लावली. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तवला आहे. अशातच 26 जून 2026 रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : Exclusive Video: पुण्यातील कॅफेमध्ये बॉयफ्रेंड चेतनला बोलावलं, कॉफी पित थंड डोक्याने सियाने ठरवला गेम अन्..

कोकण 

कोकण विभागात पावसाचा जोर कायम असून पालघर, ठाणे आणि मुंबईसह काही ठिकाणी विजांसह  पाऊस दमदार हजेरील लावणार असल्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून पुणे, कोल्हापूर घाटमाथा पसिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.  

मराठवाडा 

मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडटसह मान्सूनजन्य परिस्थिती निर्माण  झाली आहे. याचा काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : कल्याण: टोमॅटोचा बहाणा, 55 वर्षीय वृद्धानं 7 वर्षीय चिमुरडीला बंद दारआड..

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसह यलो अलर्टचा मान्सून जारी करण्यात आला. इतर काही जिल्ह्यांत कोरडं हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.