मुंबईची खबर : प्रवाशांना आता जलद गतीने लोकलमध्ये चढता येणार, पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

लोकलचे वेळापत्रक सांभाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गर्दी असणाऱ्या स्टेशन्सवर प्रवाशांना डब्यात चढण्यासाठी मदत होणार आहे. हा निर्णय नेमका काय आहे, जाणून घेऊया.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 04:04 PM • 26 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : प्रवाशांना आता जलद गतीने लोकलमध्ये चढता येणार,

point

पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai News : एसी लोकल वेळेत सुटाव्या आणि प्रवाशांना जलद गतीने डब्यात चढण्यास मदत व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गर्दी असलेल्या स्टेशन्सवर आता पुशर्सची नेमणूक केली जाणार आहे. हे पुशर्स प्रवाशांना जलद गतीने डब्यात चढण्यासाठी मदत करतील. स्टेशनवरुन गाड्या थांबण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही सेकंदांचाही उशीर झाला, तर त्याचा परिणाम इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. हा विलंब टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

पुशर्स कोण असतील?

गर्दी असणाऱ्या स्टेशन्सवर या पुशर्सची नेमणूक केली जाणार आहे. हे 'पुशर्स' प्रशिक्षित कर्मचारी असतील, जे प्रामुख्याने गर्दीच्या वेळी एसी लोकलमध्ये प्रवाशांना चढण्यास मदत करतील. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'एसी लोकलला स्वयंचलित दरवाजे असतात आणि त्यात प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग मर्यादित असतात. गर्दीच्या वेळी प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी जास्त वेळ लागतो, ज्यामुळे स्थानकांवरील गाड्यांचा थांबण्याचा वेळ वाढतो आणि .याचा पुढील वेळापत्रकावर थेट परिणाम होतो.' 

हे ही वाचा : अशोक चव्हाणांची 'ती' पोस्ट अन् नेटकरी तुटून पडले, कमेंट्समध्ये बेधडक सवाल

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

यासोबतच एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवासाची 18,305 प्रकरणे नोंदवली गेली. मागील वर्षापेक्षा विनातिकिट प्रवास करणाऱ्यांमध्ये यावर्षी 323% अधिक वाढ झाली आहे. 

हे ही वाचा : नवरा बाहेर असताना 'तो' महिलेसोबत फ्लॅटमध्ये.., शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

एसी लोकल्सची संख्या वाढणार का?

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्दीच्या वेळी एसी लोकल्सची संख्या वाढवण्याची कोणतीही योजना सध्या नाही. असे असले तरी पुशर्सची नेमणूक करण्याची पश्चिम रेल्वेची योजना कितपत फायदेशीर ठरते ते बघावं लागेल.