Maharashtra Weather : उन्हाळा ऋतू सुरु असला तरी राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचं वातावरण असल्याची शक्यता आहे. कोकणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 18 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सातारा : कराडमध्ये भीषण अपघात; शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले… कंटेनरच्या भरधाव वेगानं होत्याचं नव्हतं झालं
कोकण
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने हवामानाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यापैकी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : पाचवीतील मुलीवर अॅसिड हल्ला, तो नराधम कोण ज्यानं केल मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त?
विदर्भ
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया वर्धा आणि यवतमाळमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला, तसेच वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात हवामान विभागाने कसलाही इशारा जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











