बीड पुन्हा हादरले! सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणाचे कृत्य; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Beed Crime : बीड जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींविरुद्ध वाढणाऱ्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बीड शहरात एका 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

• 08:38 AM • 18 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड पुन्हा हादरले! पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

point

शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणाने कृत्य

point

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Beed Crime, रोहिदास हातागळे : बीड जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींविरुद्ध वाढणाऱ्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बीड शहरात एका 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलुंड हादरलं! बायकोला चक्क ट्रेनसमोर दिलं ढकलून अन् नवऱ्याने...

घरी गेली अन् नराधमाने केला अत्याचार

ही हृदयद्रावक घटना सोमवार, 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाच्या घरी गेली होती, तिथे आरोपीने तिच्यावर कथितरित्या अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या चिमुरडीने घरी परतल्यावर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी (17 मार्च) सकाळी पीडित मुलीच्या पालकांनी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

तक्रार मिळताच पेठ बीड पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 'शारीरिक संबंध सहमतीने ठेवलेले...', Army ऑफिसरबाबत कोर्टाचा अत्यंत मोठा निर्णय

बीडमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच बीड तालुक्यात एका महिलेला घरातून उचलून नेऊन तिला बांधून छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या घटनेची आग अजून शांत झालेली नसतानाच, या चिमुरडीसोबत झालेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

    follow whatsapp