लवकरच WHO च्या यादीमध्ये Covaxin चा समावेश होणार, Bharat Biotech कडून महत्त्वाचं ट्विट

मुंबई तक

• 06:32 PM • 12 Jul 2021

मुंबई: भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस कोव्हॅक्सिन (Covaxin) लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये (EUL) समाविष्ट केली जाऊ शकते. भारत बायोटेक सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी EUL मध्ये समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे 9 जुलै रोजी WHO कडे सादर केली आहेत. यानंतर, आता अशी अपेक्षा केली जात आहे की, […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस कोव्हॅक्सिन (Covaxin) लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये (EUL) समाविष्ट केली जाऊ शकते. भारत बायोटेक सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी EUL मध्ये समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे 9 जुलै रोजी WHO कडे सादर केली आहेत. यानंतर, आता अशी अपेक्षा केली जात आहे की, लवकरच कोव्हट देखील ईयूएलमध्ये समाविष्ट होऊ शकेल.

हे वाचलं का?

भारत बायोटेक यांनी ट्विट केले की, कोव्हॅक्सिनच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंग (EUL) मध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे 9 जुलै रोजी डब्ल्यूएचओकडे सादर केली गेली आहेत. यामुळेच कंपनीने आशा व्यक्त केली आहे की लवकरच कोव्हॅक्सिन देखील डब्ल्यूएचओच्या ईयूएलमध्ये समाविष्ट होऊ शकेल.

4 ते 6 आठवड्यात घेतला जाऊ शकतो निर्णय

यापूर्वी, WHO चे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सांगितले होते की भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय 4 ते 6 आठवड्यात होऊ शकतो.

EUL मध्ये अशाप्रकारे समाविष्ट केली जाते एखादी लस

डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले होते की, आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये एखाद्या लसीचा समावेश करण्यापूर्वी एक प्रक्रिया पार पाडणं गरजेचं असतं. त्याअंतर्गत कंपनीला लस चाचणीचे तीनही टप्पे पूर्ण करावे लागतात. यानंतर डब्ल्यूएचओच्या नियामक विभागाला संपूर्ण डेटा द्यावा लागतो. तज्ज्ञ सल्लागार गटाकडून याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेमध्ये कंपनीकडून संपूर्ण डेटा सादर केला जातो. यामध्ये सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादन गुणवत्तेच्या मानकांचा देखील समावेश आहे.

सध्या कोणकोणत्या लस या EUL मध्ये आहेत समाविष्ट?

आत्ताच WHO ने आपत्कालीन वापरासाठी फायझर, कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, जॅनसेन, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सिनोफॉर्मा यांना मान्यता दिली आहे. स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार तज्ज्ञ सल्लागार गटाच्या सल्ल्यानुसार आपत्कालीन यादीमध्ये 6 लसींचा समावेश करण्यात आला आहे.

Covaxin की Covishield; कोणती Vaccine जास्त प्रभावी ?

याआधी WHO ने नेमकं काय म्हटलं होतं?

Covaxin या भारत बायोटेकने तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या लसीबाबत आणखी माहिती पुरवण्यात यावी असं आता WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं. Covid-19 साठी भारत बायोटेकच्या लसीला आमच्या सूचीत समाविष्ट करून घ्यायचं असल्यास त्यांनी या लसीबाबत आणखी माहिती पुरवावी. असं WHO ने म्हटलं होतं.

WHO च्या वेबसाईटवर 18 मे रोजी WHO EUL मूल्यांकन प्रक्रियेत कोव्हिड 19 प्रतिबंध करणाऱ्या लसींची सद्यस्थिती हा अहवाल पोस्ट करण्यात आला होता. हा एक दिशादर्शक अहवाल होता. त्यामध्ये WHO ने असं म्हटलं होतं की, कोव्हिड 19 लसीसंदर्भात भारत बायोटेकने 19 एप्रिल रोजी एक EOI आम्हाला सोपवलं होतं. मात्र आम्हाला आणखी माहिती मिळणं आवश्यक आहे.

    follow whatsapp