भाजपच्या पोलखोल यात्रेवर दगडफेक, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याविरोधात भाजपने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपकडून मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. तसंच पोलखोल यात्रेचीही सुरूवात करण्यात आली आहे. याच पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ लवकरच होणार आहेत. मागच्या २४ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:04 PM • 19 Apr 2022

follow google news

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याविरोधात भाजपने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपकडून मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. तसंच पोलखोल यात्रेचीही सुरूवात करण्यात आली आहे. याच पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ लवकरच होणार आहेत. मागच्या २४ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आहे.महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होत असून जनकल्याणाची काम ठप्प झाली आहेत .याचाच निषेध नोंदवत आजपासून भाजपच्या वतीने पोल खोल अभियान सुरू करण्यात आलं. यासाठी भाजपच्या वतीने एक रथ तयार करण्यात आला आहे त्याच उदघाटन चेंबूर भाजप कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार होते पण या रथाची समोरील बाजूची काच अज्ञात व्यक्तीने फोडली. भाजपचे कार्यकर्ते यामुळे संतप्त झालेले आहे या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आला.

या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. हे असे प्रकार घडणं आम्हाला अपेक्षितच आहे. मात्र काहीही झालं तरीही आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल सुरूच ठेवणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आमची पोलखोल यात्रा यशस्वी होत आहे. त्यामुळं त्यावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत. सरकारला लक्षात येत आहे की आपल्या भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण बाहेर येत आहेत त्यामुळं हे हल्ले होत आहेत. आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत. कुणी किती जरी हल्ले केले तरी ही पिलखोल यात्रा थांबणार नाही.”

    follow whatsapp