मुंबईतील 32 वर्षीय पोलिसाचं प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल, गर्लफ्रेंडच्या वडिलांनी धमकी दिल्याचा आरोप, सुसाईड नोटमध्ये...

Mumbai crime : मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी दखल झालेल्या 32 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस तरुणाने सांताक्रूझ प्रशिक्षण केंद्रातच कथितरित्या आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Mumbai crime

Mumbai crime

मुंबई तक

18 Mar 2026 (अपडेटेड: 18 Mar 2026, 06:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोलिसात रुजू झालेल्या तरुणाचं प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल

point

मृतदेहाजवळ सुसाईड नोटमध्ये काय?

Mumbai crime : मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी दखल झालेल्या 32 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस तरुणाने सांताक्रूझ प्रशिक्षण केंद्रातच कथितरित्या आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस प्रशिक्षण केंद्रात नव्याने भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टबेलच्य़ा टोकाच्या निर्णयाने पोलीस विभागात खळबळ माजल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नवविवाहित तरुणाच्या गुद्दद्वारात 36 तास पाण्याची बाटली अडकली, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

मुंबई पोलिसात रुजू झालेल्या तरुणाचं प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख पटली आहे. भैय्यासाहेब मारूती वावळे (वय 32) असे नाव आहे. तो मुंबई पोलिसात चालक म्हणून रुजू झाला होता. या प्रकरणात वडील भीमराव मारूती वावळे (वय 55) यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यांचा मुलगा 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई पोलीस म्हणून कार्यरत होता. 15 मार्च रोजी सकाळी, त्यांना कलिना प्रशिक्षण केंद्रातून फोन आला की, त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. 

मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली होती. या प्रकरणी वडिलांचा दावा असा की, सुसाईड नोटमधील अक्षर हे दुसरे तिसरे कोणाचे नसून मुलाचेच आहे. संबंधित सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, दीड वर्षांपासून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणाच्या वडिलांनी त्याच्या लग्नासाठी दुसरी मुलगी बघितली होती. त्याने आपल्या कुटुंबाला प्रेमसंबंधाबाबत माहिती देखील दिली होती, नंतर भैय्यासाहेबांना फोन करून धमकी देण्यात आली. 

मुलाने मुलीचा पाठलाग करणं सुरुच ठेवलं तर ते त्यांना ठार मारून टाकतील, त्यांची नोकरी काढून टाकतील. सुसाईड नोटमध्ये असा आरोप करण्यात आला की, तरुणीच्या आई वडिलांच्या धमक्यांमुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं. 

हे ही वाचा : रुपाली चाकणकरांकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं ट्वीट व्हायरल

संबंधित प्रकरणात वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, वाकोला पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध टोकाचे पाऊल उचलल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक तुषार कैलाश मुंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही सुसाई़ड नोट कलिना मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बी विंगमध्ये खोली नंबर 4 मध्ये आढळून आली होती. 

    follow whatsapp