बरेली: उत्तर प्रदेशातील बरेली येथे सासू आणि मेहुण्याची हत्या करून फरार झालेला अफसर खान मंगळवारी (17 मार्च) सकाळी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अफसर खानला त्याच्या किशोरवयापासूनच गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती. त्याने मामीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे थेट मामाची हत्या केली होती. त्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता. तर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याने आपल्या चुलत बहिणीशी जबरदस्तीने लग्नही केले होते. त्याचे कुटुंबही त्याच्या भीतीने जगत होते. सासू आणि मेहुण्याची हत्या करताना त्याने आपल्या पत्नीवरही चाकूने वारंवार वार केले होते. सध्या त्याची पत्नी आयसीयूमध्ये दाखल आहे.
ADVERTISEMENT
कुटुंबीयांनी खुलासा केला की, 2004 मध्ये अफसर खानचे त्याच्या मामीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावेळी अफसर खान सुमारे 16 वर्षांचा होता. याच संबंधातून त्याने आपल्या मामीसोबत मिळून मामाची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात अफसर आणि त्याच्या मामीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 2016 मध्ये अपीलवर त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि तो गावात परतला, जिथे तो एक गुंड बनला. मात्र, या घटनेनंतर सर्वजण त्याला घाबरू लागले. मग त्याने शेजारी राहणाऱ्या त्याची चुलत बहीण सायमा हिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
कुटुंबाने याला विरोध केला, पण त्याने त्यांना जुमानलं नाही आणि मे 2017 मध्ये त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. मात्र, अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तो सायमाला वारंवार मारहाण करत असे. परिणामी, 2022 मध्ये त्याच्यावर हुंडा छळाचा गुन्हा दाखल झाला, पण त्याने सायमाची समजूत काढली होती.
सासू आणि मेव्हण्याची हत्या
आपल्या मेव्हण्याची आणि सासूची हत्या करणाऱ्या अफसर खानने हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने केला. बैठकीत उपस्थित असलेला या घटनेचा प्रत्यक्षदर्शी यासीन म्हणाला की, त्याने पूर्ण नियोजन करून चाकू आणला होता. पण त्याचा हेतू कोणालाच कळला नाही, कारण यावेळी त्याने ईदच्या सणाचे कारण देत आपल्या पत्नीला हे प्रकरण मिटवण्यास सांगितले होते. बोलता बोलता अफसरने आपल्या पत्नीला धमकी दिली की, जर ती त्याच्यासोबत राहिली नाही, तर तो तिला ठार मारेल. त्यावेळी त्याच्या मेव्हण्याने त्याला विरोध केला. ज्यामुळे संतापलेल्या अफसरने चाकूने हल्ला केला.
हे ही वाचा>> शिरुर : समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे हत्या झाल्याचा संशय, 6 वीच्या विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी यासीन खान म्हणाला की, अफसर खान अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता आणि तो वारंवार आपली पत्नी सायमा हिला मारहाण करत असे. त्याने तिला अनेक वेळा मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. दोन दिवसांपूर्वी, त्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढले होते. त्यामुळे सायमा तिच्या माहेरी गेली होती. त्यानंतर अफसर खानने ईदचे कारण सांगून आपला मेहुणा, माजी नगरसेवक उमेदवार रशीद खान याला आपल्या पत्नीसोबत मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यास सांगितले. रशीदने यापूर्वी त्यांच्यात एक तोडगा काढला होता, त्यामुळे जेव्हा सणाचे कारण पुढे केले, तेव्हा तो दुसऱ्यांदा समजोत करून देण्यास तयार झाला. मात्र, यावेळी अफसर खानचा हेतू दुष्ट होता. त्याने ठरवले होते की, जर त्याच्या पत्नीने येण्यास नकार दिला, तर तो तिला ठार मारेल. याच उद्देशाने त्याने बैठकीला येताना एक चाकू लपवून आणला होता.
नेमकं काय आणि कसं घडलं?
यासीनने सांगितले की, जेव्हा त्याचा मेहुणा रशीदने दोन्हीकडील लोकांना एकत्र बसवून चर्चा सुरू केली, तेव्हा अफसर खानने आपली पत्नी सायमावर सोबत येण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र, अफसरच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आणि शारीरिक हिंसेमुळे व्यथित झालेल्या सायमाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यामुळे अफसर संतापला आणि त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जर ती त्याच्यासोबत राहिली नाही तर तिला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. जेव्हा तिचा भाऊ आदिल याने त्याला विरोध केला, तेव्हा अफसरने थेट चाकू काढून त्याच्या छातीत आणि पोटात वारंवार वार केले. जेव्हा आदिल जमिनीवर पडला, तेव्हा त्याची आई अस्मा, आणि बहीण सायमा, त्याला वाचवण्यासाठी पुढे धावल्या. यावेळी अफसरने अस्माला लाथ मारून जमिनीवर पाडले आणि तिच्यावरही हल्ला करून तिच्या छातीत आणि पोटात वार केले.
हे ही वाचा>> बायको आणि Ex Boyfriend सापडले हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत, Love Marriage केलेल्या पतीला बसला मोठा धक्का!
त्यानंतर त्याने सायमावर झडप घालून तिच्या मानेवर आणि पोटात वार केले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला आणि अफसर खान यादरम्यान, पळून गेला. त्या तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत आदिल आणि त्याची आई अस्मा यांचा मृत्यू झाला होता. तर सायमाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपी अफसरचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात अफसर ठार झाला.
ADVERTISEMENT











