छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

मुंबई तक

• 04:23 PM • 22 Aug 2026

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. कौटुंबिक वादातून एकाच घरातील तीन सदस्यांनी 300 फूट खोल दरीत उडी मारत आपले जीवन संपवले.

chhatrapati sambhajinagar crime

chhatrapati sambhajinagar crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आधी लेक आणि नवरा 300 खोली दरीत पडले

point

आईचाही खोल दरीत पडून दुर्दैवी अंत

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. कौटुंबिक वादातून एकाच घरातील तीन सदस्यांनी 300 फूट खोल दरीत उडी मारत आपले जीवन संपवले. घडलेल्या घटनेनुसार, कुणाल चंद्रगुडे (वय 19) कुणाल चंद्रगुडे याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करत जीवन संपवलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत, नवऱ्याला बलात्काराचा संशय

आधी लेक आणि नवरा 300 खोली दरीत पडले, नंतर आई.. 

तर आई संगीता चंद्रगुडे यांनी आपल्या डोळ्यासमोर नवरा आणि मुलाला खोल दरीत पडताना पाहिले. त्यानंतर आई संगीता देखील नैराश्यात गेली आणि तिने देखील 300 फूट खोल दरीत उडी मारत प्राण गमावले. या भीषण घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. 

श्वान अन्नाचा घास घेईना 

कुणालला कुत्र्यांची खूप आवड होती, तो रोज सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन जायचा. आज तोच मुका जीव अन्नाचा घास देखील खात नाही. शेजारच्यांचे म्हणणे असे की, श्वानास घरातील या तीन सदस्यांची अधिकची सवय होती. यामुळे त्यांनी पोलिसांना आवाहन केलं की, श्वानास घरातून बाहेर काढलं जावं आणि त्यांची देखभाल केली जावी. 

हे ही वाचा : आई आणि लेकराच्या नात्याला काळिमा, पोटच्या मुलाने आईसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप

खोली मालकाच्या माहितीनुसार, चंद्रगुडे कुटुंबीय हे काही महिन्यांपासून येथेच राहत होते. वडील मुरलीधर चंद्रगुडे ट्राक ड्रायव्हर होते आणि कामाच्या निमित्ताने अनेकदा घराबाहेर जात होते. कुटुंबीयांना पाहून कधीच वाटलं नाही की, या कुटुंबासोबत असं काही होईल.