आई आणि लेकराच्या नात्याला काळिमा, पोटच्या मुलाने आईसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप
Crime News : आईनेच आपल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा लज्जास्पद आरोप लावला आहे. या घटनेनं आई आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्रीच्यावेळी महिलेसोबत गैरकृत्य
आरोपीने महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी
Crime News : आईनेच आपल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा लज्जास्पद आरोप लावला आहे. या घटनेनं आई आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पीडितेनं सांगितलं की, 14 ऑगस्ट रोजी मुलाने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना हरियाणाच्या पानिपत येथील आहे.
हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत, नवऱ्याला बलात्काराचा संशय
रात्रीच्यावेळी महिलेसोबत गैरकृत्य
पीडितेनं पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली, नंतर न्यायालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनुसार, पीडिता आपल्या मुलासोबत घरीच राहत होती. दरम्यान, पीडितेनं आरोप केला की, रात्रीच्या वेळी तिच्यासोबत गैरकृत्य केले.
आरोपीने महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी
आरोपीने तिला कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांना कळवल्यास जीवे मारेन. आरोपीने धमकी दिल्यानंतर पीडित महिलेनं धाडस दाखवत नराधम लेकाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्याला माहिती दिली होती. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : पुणे : 'तुझे विवस्त्र फोटो पाठव...' अध्यात्माच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, इन्फ्लुएन्सर ताब्यात
पोलीस प्रकरणात एकूण पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच पीडित महिलेनं केलेला आरोप आणि वैद्यकीय तापसाबाबत एकूण माहिती मिळवली जाते. पोलिसांचे म्हणणे असे आहे की, या प्रकरणात पुढील कारवाई केली जाते. पानीपतमध्ये 14 ऑगस्ट रोजी रात्री मुलाने आईसोबत अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरून तरुणाला अटक केली आहे.
