बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर जावयाला संपवलं अन्..

मुंबई तक

• 03:14 PM • 23 Aug 2026

Crime News : बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर नवऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत नवऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. मृत सॉफ्टवेअर इंजीनिअर पतीची ओळख समोर आलेली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीत लग्नावरून मोठा वाद

point

नवऱ्याला बेदम मारहाण 

Crime News : दिल्लीच्या लक्ष्मी पार्क येथे बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर नवऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत नवऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. मृत सॉफ्टवेअर इंजीनिअर पतीची ओळख विनय गुप्ता (वय 31) अशी ओळख समोर आली. दोघांनाही एक मुलगा आणि मुलगी आहे. ते सध्या साडेचार वर्षांचे आहेत. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत 103(1) आणि  3(5) गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कावड यात्रेत DJ वाहनांची धडक; एकाचा मृत्यू; Video व्हायरल

पती-पत्नीत लग्नावरून मोठा वाद

गुरूवारी सकाळी, पती-पत्नीत लग्नावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर मृत नवऱ्याच्या पत्नीने आपल्या माहेरच्या मंडळींना बोलावले आणि निहाल विहीर येथे राहणाऱ्या मृताच्या घरी पोहोचले. मृत पत्नीच्या कुटुंबीयांनी कथितरित्या नवऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. 

नवऱ्याला बेदम मारहाण 

वनियच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, आईच्या समोर नवऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. नंतर त्यांनी दावा केला की, पत्नीच्या कुटुंबियांकडून सहा नातेवाईक नवऱ्याच्या घरी चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. संबंधित प्रकरणात कुटुंबीयांनी दावा केला की, कथितरित्या हल्ला सुरू केल्यानंतर गुप्ताची आई नातेवाईकांना पाणी नाश्त्याची सुविधा करण्यासाठी गेली होती. जेव्हा ती घरी परतली असता, त्यांनी पाहिलं की मुलाला बेदम मारहाण केली जात आहे. या प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करण्याचा देखील अधिक प्रयत्न केला होता. 

कुटुंबाने आरोप केला की, महिलेनं नवऱ्याला सोडवण्यासाठी आरडाओरड केली. नंतर गुप्ता याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, काही काळापासून त्या जोडप्यात किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते आणि वाटाघाटीतून हे प्रकरण सुटेल अशी कुटुंबाला आशा होती.

हे ही वाचा : बारामती : रोहित पवारांच्या पीएच्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निहाल विहार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, कायदेशीर कारवाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.