Crime News Alappuzha : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरिपडच्या करुवट्टा परिसरात 67 वर्षीय शिवनकुट्टी यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. या प्रकरणात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसह चार अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवनकुट्टी हे परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत होते. घटनेच्या वेळी ते घरात एकटे होते. त्यांचा मृतदेह घराच्या आत आढळून आला. त्यांचे हात-पाय बांधलेले होते आणि गळ्याभोवती कापड घट्ट बांधलेले होते. घरातून सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याचे तपासात समोर आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : कड्यावरून मुलाची आत्महत्या, वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही मारली उडी..VIDEO
फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सुरुवातीला ही घटना चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने झालेली हत्या असावी, असा पोलिसांचा संशय होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना एका 13 वर्षीय मुलीच्या कथित भूमिकेबाबत माहिती मिळाली. पोलिसांच्या आरोपानुसार, मृत शिवनकुट्टी हे त्या मुलीचे नातेवाईक होते. हत्या करण्याच्या कथित कटात तिची महत्त्वाची भूमिका होती. तिने इतर अल्पवयीन आरोपींना शिवनकुट्टी यांच्या घराचे ठिकाण आणि त्यासंबंधी आवश्यक माहिती दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
हेही वाचा : हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक
तीन अल्पवयीन मुलांवर हत्येत सहभागी असल्याचा आरोप
या प्रकरणात 17 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांवर हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवनकुट्टी यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने कथितरित्या चोरले. हे सोने विकून पैसे मिळवण्याची योजना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पैशातून मुलगी आणि तिच्या साथीदारांसाठी महागड्या वस्तू खरेदी करण्याचा कथित प्लॅन होता. प्राथमिक माहितीनुसार, मुलीसाठी आयफोन आणि तिच्या बॉयफ्रेंडसाठी बाइक खरेदी करण्याची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या संदर्भात तपास अद्याप सुरू आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर झालेली व्हिडिओ कॉल. पोलिसांच्या माहितीनुसार, इतर अल्पवयीन आरोपींनी हत्येनंतर 13 वर्षीय मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि शिवनकुट्टी यांचा मृतदेह दाखवला. त्यामुळे हत्येपूर्वी आणि हत्येनंतर आरोपींमध्ये किती वेळा संपर्क झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हत्या नेमकी कधी आणि कशी नियोजित करण्यात आली, आरोपी घरात कसे दाखल झाले आणि चोरी केलेले सोन्याचे दागिने कुठे नेण्यात आले, याचाही तपास सुरू आहे. 13 वर्षीय मुलीने कथितरित्या इतर आरोपींना कोणती माहिती आणि निर्देश दिले होते, याबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT












